पुणे जिल्हा : आंबेगावच्या आदिवासी भागात शेती मशागतीला वेग

डिंभे – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या पावसाळयापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून भिमाशंकर, आहुपे, पाटण, कोंढवळ या भागात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार अतिवृष्टी पावसासाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलून नवीन … Read more

Pune : उपनगरांत जोरदार पाऊस हडपसर, कात्रज, आंबेगाव, धायरीत मुसळधार

पुणे –  सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या हडपसर, कात्रज, आंबेगाव, धायरी परिसरात सायंकाळी चारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, शहराच्या उर्वरित भागांत हलक्या सरी झाल्या. त्यामुळे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत हडपसर येथे सर्वाधिक १३ मि.मी. पाऊस झाला. शनिवारी (दि. 18) सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. दुपारी उन्हाचा … Read more

पुणे जिल्हा | आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चाऱ्याची टंचाई

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या दुष्काळी गावांमध्ये चाऱ्याची टंचाई भासू लागली असून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकतचा चारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडले आहे. तर पुढील काही दिवसात पाण्याची टंचाई देखील भासणार आहे. आंबेगावच्या पूर्व भागात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे जनवारांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, … Read more

पुणे जिल्हा | पार्वतीबाई निकम प्रतिष्ठानतर्फे गरीब कुटुंबाला आर्थिक मदत

रांजणी, (वार्ताहर) – नागापूर (ता.आंबेगाव) येथे पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी अनिता विशाल लोहकरे (तेरूंगण, ता. आंबेगाव) रुपये ३० हजार, चंद्रभागा बबन लोहकरे (राजापूर, ता.आंबेगांव ) रुपये १० हजार, सुषमा दौलत शिंदे (मंचर) रुपये १० हजार या निराधार महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष … Read more

पुणे जिल्हा | कारेगाव फाटा ते गावठाण रस्त्याची दूरवस्था

पेठ, (वार्ताहर) – गेली अनेक वर्षांपासून कारेगाव फाटा ते म्हसोबा माऊली मंदिर कारेगाव गावठाण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. कारेगाव तालुका आंबेगाव येथील गावाला जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ठिकाणी उंच सखलपणा, मोठमोठे खड्डे या रस्त्यामध्ये आहेत. साधारणपणे ५०० मीटर लांबीचा हा रस्ता असून कारेगाव गावाला जोडणारा हा प्रमुख आणि एकमेव रस्ता … Read more

पुणे जिल्हा | पारगावच्या बारावीच्या केंद्रावर दिली ४५२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा

पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान विद्यालयात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परीक्षेला ४५२ विद्यार्थी बसले होते. पारगाव येथील विद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षा केंद्र क्रमांक- ०१४३ मधील परीक्षा केंद्रात पाच, शाळेतील … Read more

पुणे जिल्हा | डंपरच्या धडकेने कळंब येथे कमान उध्वस्त

मंचर, (प्रतिनिधी) – कळंब, ता. आंबेगाव येथील महाळुंगे पडवळ फाट्याजवळील हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या नावाने असणारी कमान (वेस) डंपर हायवा चालकाच्या हलगर्जीपणामुळे उध्वस्त झाली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, वेशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास साबळे आणि सतीश तांबे यांनी भेट देऊन पाहणी … Read more

पुणे जिल्हा : आंबेगावात राष्ट्रवादीतील दुही वाढविण्याचा प्रयत्न

नागापूर येथे अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी मंचर/पारगाव शिंगवे – नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री नागेश्वर मंदिर येथे लावलेल्या कोनशिलेवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर पट्टी लावून गावात अशांतता निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थ नागापूर यांच्या वतीने पारगाव पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामधून देवदत्त … Read more

PUNE: आंबेगावात तब्बल ११ इमारती जमीनदोस्त

पुणे –  महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या मनमानी अनागोंदी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. आंबेगाव ब्रुद्रूकमध्ये अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या बांंधकामाला महापालिकेने २०२१ मध्ये नोटीस बजावली होती. त्यावेळी किरकोळ कारवाई करून सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे नाटक केले. त्यानंतर या बांधकामाच्या तब्बल ११ इमारती उभ्या राहिल्या. आता यातील घरांची विक्री झाल्यानंतर महापालिकेने तब्बल दोन वर्षांनंतर या सर्वच्या … Read more

पुणे जिल्हा : आंबेगावात भात पिकाचे नुकसान

आदिवासी पश्‍चिम भागात वादळी पावसाची दमदार हजेरी तळेघर – आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी भागाला गुरुवारी (दि. 9) सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर गुरुवारी दुपारपासून आकाशात ढग भरून आले आणि सायंकाळी अचानक सहापासून वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांची धांदल उडाली. पावसाने सुमारे तीन तास हजेरी लावली. हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे … Read more