पिंपरी | कर्जतमधील कुपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

कर्जत, {विजय डेरवणकर}– कर्जत तालुक्यामध्‍ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्‍या वर्षी २०१ बालकांची नोंद झाली आहे. गेल्‍यावर्षी १४६ कुपोषित बालकांची नोंद झाली होती. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे कुपोषित बालकांपर्यंत पोषक आहार न पोहोचल्याने ही संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. कर्जत तालुक्‍यात आदिवासी वाड्या–वस्‍त्‍यांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षणाचा अभाव, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या समाजात कमी … Read more

पुणे जिल्हा | शेलारपट्टा अंगणवाडीला दहा हजाराची मदत

पळसदेव, (वार्ताहर)- जिल्हा परिषद शाळा शेलारपट्टा येथे नागरिकांनी खर्चातून मिनी अंगणवाडी सुरु केली आहे. या भागातील पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी येथील नागरिकांनी वर्गणी करून मिनी अंगणवाडी सुरु केली आहे. यामध्ये सध्या सोळा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे अद्याप शासनाच्या वतीने मिनी अंगणवाडीला मान्यता मिळाली नसल्यामुळे दर महिन्याला नागरिक तीन हजार रुपये जमा … Read more

नगर | नगरमध्ये एक लाख एकल महिला

नगर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडीमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल एक लाख ७२६ महिला आढळल्या. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. यावर कृतिआराखडा राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काल … Read more

PUNE: आंदोलनाचा ५०वा दिवस आमदारांच्या दाराशी

येरवडा – सनदशीर मार्गाने आंदोलने करुनही राज्य सरकार त्याची दखल घेत नसल्याने ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते त्या आमदारांच्या कार्यालयाबाहेर अंगणवाडी ताईंनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी, आमदार तुपाशी अंगणवाडी ताई उपाशी, अशा घोषणा देत अंगणवाडी ताईंनी आमदार सुनील टिंगरे तसेच पुण्यातील इतर आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, भरवी … Read more

पुणे जिल्हा: नोटीसा दिल्याने अंगणवाडीसेविका संतप्त

मंचर  – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणार्‍या सेविकांच्या मागण्यांचा कोणताही विचार न करता लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असल्याने आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कामाहून काढण्याच्या नोटीसा पुणे जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन बळजबरीने दडपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास आक्रोश मोर्चा काढावा लागेल, असा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीस … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आज मुंबईत आंदोलन

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या संपाला एक महिना पूर्ण होत आहे. संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीने बुधवारी (दि.3) सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई व अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, … Read more

पुणे जिल्हा: संप फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आंदोलन

भोर : अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्शने करण्यात आली. भोर – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सध्या दि. ४ डिसेंबरपासून संप चालू आहे. शांततेच्या मार्गाने हा संप चालू असताना दादागिरी करून हा संप फोडण्यासाठी काही सुपरवायझर यांनी प्रयत्न केले. त्याचे निषेधार्थ भोर तालुक्यातील मदतनीस नवीन रुजू झालेल्या अंगणवाडीसेविका यांनी तीव्र निदर्शन करून सुपरवायझरांचा … Read more

पुणे जिल्हा : अंगणवाडी, आशा सेविकांना न्याय मिळालाच पाहिजे

आमदार दत्तात्रय भरणे : नागपूरच्या अधिवेशनात मांडली आग्रही भूमिका इंदापूर – राज्यात सध्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचे असंख्य प्रश्‍न प्रलंबित असून यांचे सर्वच प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात,औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्यासाठी शासनाचे लक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांनी आक्रमकपणे वेधले. इंदापूर तालुका, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेने … Read more

PUNE: अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित

पुणे –  एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे वय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा ३० एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील … Read more

वेल्ह्याच्या अंगणवाडीतील मुले झाली हुशार; जिज्ञासा अन् कुतूहल वाढविण्यासाठी अभिनव प्रयोग

मुंबई – वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग आलेल्या चीरमोडी गावातील अंगणवाडीने अभिनव प्रयोग राबविला आहे. विद्यार्थी दशेतच लहान मुलांना काही नवीन शिकण्याची गोडी लागते. त्यावेळी मिळालेले ज्ञान हे त्यांना केव्हाही उपयुक्त ठरणारे असते. त्यासाठी शिक्षक नेहमीच शाळेत विद्यार्थ्यांकरिता काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या चीरमोडी अंगणवाडीत राबविलेल्या उपक्रमाची … Read more