12वीच्या परीक्षा ऑनलाइन घ्या – अंकिता पाटील

रेडा  -इयत्ता दहावीच्या जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. 13 लाख इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना मे अखेरीस परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे हे योग्य आहे का? बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी करोनाच्या परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहून त्यांचे जीव पणाला का लावावेत? महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षा ऑनलाइन … Read more

“त्या’ रुग्णालयांचे श्रेय हर्षवर्धन पाटलांचेच; अंकिता पाटील यांचे प्रतिपादन

रेडा, -इंदापूर तालुक्‍यात बावडा ग्रामीण रुग्णालय व भिगवण ट्रामा सेंटर रुग्णालयांची मंजुरी व त्यानंतर उभारणीसाठी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांच्या उभारणीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले. हर्षवर्धन पाटील यांनी 2012 मध्ये मंत्री असताना बावडा उपकेंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये केले. तसेच … Read more

जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्या हस्ते 1371 स्पर्धकांचा सन्मान

रेडा (प्रतिनिधी/नीलकंठ मोहिते ) – शिवजयंती निमित्त जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने शिवजन्मोत्सव ऑनलाईन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना दि.5 मार्च रोजी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या कार्याध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव करून त्यांना … Read more

कोपर्डीप्रकरणी सरकार उदासीन -अंकिता पाटील

रेडा (वार्ताहर) – कोपर्डी बलात्कार व हत्याकांड प्रकरणाला (दि.13) चार वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु त्या भगिनीला अद्याप न्याय देण्यात राज्य शासनाला अजूनही यश आले नाही. याप्रकरणी सरकारने तातडीने पावले उचलून पीडित भगिणला न्याय द्यावा; अन्यथा सरकारविरोधात रस्त्यावर उतरू. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

इंदापुरात “आघाडी’चा गुंता वाढला

जि.प. स्थायीच्या सदस्यपद प्रकरणात राष्ट्रवादी, कॉंग्रेसची राजकीय खेळी पुणे – राज्यात लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीच्या निवडणुकीत तंतोतत पालन केले. त्यानंतर बावडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देत मदत केली. त्यावेळी आघाडीची चर्चा जोर धरू लागली. इंदापूरात आघाडीचा एकोपा शरद पवार यांच्या दुष्काळी … Read more

फलटण, सातारा अन्‌ माणमध्ये पर्यायी उमेदवार

सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे भाजप-सेनेमध्ये प्रवेश होत व होणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर आतापर्यंत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे पक्षबदलाचे परिणाम राष्ट्रवादीला जास्त प्रमाणात सोसावा लागणार असून अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष एकटा पडण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीत कालपर्यंत नेतृत्वगुण असूनदेखील अडगळीत पडलेल्या नेत्यांना महत्त्व येणार आहे. भाजप-शिवसेनेमध्ये … Read more

कॉंग्रेसमध्येच घराणेशाहीवरून चिखलफेक

झेडपी स्थायी समिती सदस्यपदावरून पाटील- झुरुंगे यांच्यामध्ये जुंपली रेडा – जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यपदासाठी रिक्‍त झालेल्या जागेवरून कॉंग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे व अंकिता पाटील यांची चांगलीच जुंपली असून घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. झुरुंगे यांनी शनिवारी (दि. 24) तर रविवारी (दि. 25) पाटील यांनी थेट नाराजी … Read more

कॉंग्रेसने पाटलांना सोडले वाऱ्यावर!

इंदापूरच्या कार्यकर्त्यांमध्ये सल : भाजप प्रवेशाचा हर्षवर्धन पाटलांकडे धरला आग्रह बावडा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आजच्या घडीला कॉंग्रेसमधील एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणूनच पाहिले जात आहे. पण कॉंग्रेसच्या राज्यातील वरिष्ठांना कदाचित हे मान्य नाही. त्यामुळेच कॉंग्रेसचा राज्यातील एकही नेता पाटील यांच्या पाठीशी उभा नाही. त्यांच्या उमेदवारीसाठी राज्यातील एकही आग्रह करताना दिसत नाही. याचीच सल इंदापूरच्या … Read more

‘मी माघार घेतली असती; पण, मला बोलू तरी द्यायचे’

पुणे – जिल्हा परिषदेतील माझा पहिला दिवस, पहिल्याच सर्वसाधारण सभेत होणाऱ्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी थेट माझे नाव सुचविले होते, असे असतानाही आज जिल्हा परिषदेत जो गोंधळ झाला. त्यामुळे मनस्ताप झाला. मला जिल्ह्यातील युवकांचे प्रश्‍न मांडायचे आहे. कामकाज कसे चालते हे समजून घ्यायचे होते. मला सभागृहाचे काम थांबवायचे नव्हते. मी माघार घ्यायलाही तयार … Read more

कॉंग्रेसमध्येच दुफळीचा ट्रेलर

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब कॉंग्रेसमधील गट-तटाचा वाद चव्हाट्यावर पुणे -जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्‍त झालेल्या एका जागेवर कॉंग्रेसच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची नियुक्‍ती अपेक्षित होती. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातच दोन गट असल्याचा धक्‍कादायक प्रकार दिसून आला. आजच्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या नियुक्‍तीसाठी प्रदेश कॉंग्रेसकडून अंकिता पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली … Read more