nagar | नाशिक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदेंचा अर्ज दाखल

नगर, (प्रतिनिधी) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.६) रोजी शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपुर्द केला. यावेळी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक विभाग शिक्षक … Read more

डिजिटल शुभेच्छा आणि 80 किलोंचा केक…

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवनामध्ये 80 किलोचा केक कापून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पक्ष अभिप्राय मोहिमेमध्ये साडेसहा लाख सभासदांपैकी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 80 हजार सभासदांनी भाग घेतल्याने या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकाविल्याबद्दल मुंबईतील कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांनी … Read more

2024 ला शरद पवार पंतप्रधान व्हावेत

कोपरगाव  -कृषी, सहकार, कला, क्रीडा, उद्योग तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे नेतृत्व आजमितीला देशात दुसरे नाही. आपल्या राजकीय अनुभवाच्या शिदोरीवर तीन पक्षांना एकत्रित आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून राज्यातील जनतेला विश्वास दिला. त्यांच्या या कुशल नेतृत्वातून आज त्यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्याबाबत … Read more

हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील काय शाश्वती?

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिवसेनेने शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमने उधळली आहेत. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे … Read more

हजरजबाबी

यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात शरद पवार हेच लोकनेते होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात स्थिरावायचं असेल तर पवार यांच्यावर आरोप करण्यावाचून पर्याय नाही, हे विरोधकांना समजून चुकले होते. त्यामुळे विरोधक बेलाशक काहीही आरोप करत. पवारसाहेब मात्र या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडत नसत. पण तरीही पवार जेव्हा उत्तर देत तेव्हा विरोधक चारीमुंड्या चित … Read more

रसिकराज

राजकारणात असले तरी शरद पवार हे साहित्यिक, कलावंत यांच्यात रमतात. त्यांना योग्य तो सन्मान देतात. त्याचेच सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी उभारलेल्या “आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर’ सभागृहाच्या उद्‌घाटन समारंभात केलेले भाषण होय.   नाना असोत भाषा माझा विरोध नाही प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही जो सत्‌विचार तो तो मज लक्षणीय आहे … Read more

जिंकणार तर पवारच

शरद पवार आणि निवडणूक यांचं एक वेगळेच समीकरण गेल्या सहा दशकांत तयार झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात वर्ष 1960 मध्ये स. गो. बर्वे यांच्या प्रचारात सक्रिय झालेले शरद पवार वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही किंगमेकर ठरले.  बीएमसीसी महाविद्यालात शिकत असताना त्यांचे उपप्राचार्य पी. व्ही. पटवर्धन सर यांनी पवार आणि त्यांच्या मित्रमंडळींना … Read more

लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब

शरद पवारसाहेब हे बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशातील साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले मर्मज्ञ, रसिक व्यक्‍तिमत्त्व म्हणजे शरद पवारसाहेब! राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे, तर केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रीय नेता म्हणून पवारसाहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला ठसा उमटवला … Read more

लोकहितकारी साहेब

राष्ट्र निर्मितीत समाज घटकांना केंद्रबिंदू मानून व्यापक जनहित जोपासणारे दूरदृष्टीचे नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 50 वर्षांत अवितरतपणे काम केले आहे. समाजमनाचा ठाव घेऊन त्यांची अंमलबजावणी हा त्यांचा हातखंडा आहे. गावपातळीपासून जगभरातील घडामोडींचा अभ्यास करून लवचिकता ठेवली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून उपेक्षित आणि वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला … Read more

तीन पिढ्यांचा तरूण योद्धा

आदरणीय शरद पवार साहेब हे कार्यकर्त्यांवर कुटुंबाप्रमाणे प्रेम करतात. संपूर्ण पवार कुटुंबीयांचे हे संचित कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांला आत्मविश्‍वास देऊन त्यांच्यात इच्छाशक्‍तीची फुंकर फक्‍त पवार कुटुंबीयांनी घातली आहे. आम्हा पानसरे कुटुंबीयांवर जीवापाड माया लावली. त्यांचा स्नेह आणि मार्गदर्शन आमच्यासाठी स्फूर्तीदायक आहे. सन्माननीय साहेबांचा शनिवार (दि.12) डिसेंबर रोजी 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. … Read more