60 हजार उमेदवारांना नऊ वर्षांनी मिळणार शुल्कपरतावा

पुणे – पुणे जिल्हा परिषदेने सन 2014 मध्ये घोषित केलेल्या कर्मचारी भरतीसाठी सुमारे 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने या अर्जापोटी घेण्यात आलेल्या प्रत्येकी 500 आणि 250 रुपये शुल्काचे 1 कोटी 28 लाख रुपये जिल्हा परिषदेकडे जमा आहेत. आता हे पैसे त्या उमेदवारांना तब्बल नऊ वर्षांनंतर परत केले जाणार … Read more

झेडपीच्या 972 पदांसाठी विक्रमी 74 हजार 578 अर्ज

सातारा – जिल्हा परिषदेच्या एकूण 21 संवर्गातील 972 पदांसाठी 74 हजार 578 अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के व आरोग्य सेवक (महिला) पदासाठी 32 हजार 230 तर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 13 हजार 550 उच्चांकी अर्ज आले आहेत. आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे वेध असून अद्याप परीक्षेची तारीख … Read more

PUNE : कामगारांच्या घरासाठी सरकार निरुत्साह; जिल्ह्यातून आतापर्यंत एकही अर्ज मंजूर नाही

पुणे – पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर कामगारांसाठी अटल कामगार आवास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही अर्ज मंजूर झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अटल कामगार योजनेपुढे मोठा प्रश्‍नचिन्ह उभा राहिला आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून कामगार आयुक्तांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यास कामगार विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे … Read more

पुणे : परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्‍त दराडे निलंबित; शासनाकडून अखेर पाच महिन्यांनी कारवाई

पुणे – शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने पैसे घेऊन नोकरी न लावता उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त तथा प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तब्बल पाच महिन्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकी बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन तब्बल 44 उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी … Read more

दोन दिवसांत तीस हजार अर्ज! तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरात युवकांची झुंबड

पुणे -तलाठी या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि.26) सुरू झाली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांत एकूण 4 हजार 644 तलाठ्यांचे पदे भरली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन दिवसातच तब्बल 30 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार जमाबंदी आयुक्त … Read more

ओला आणि उबरने महाराष्ट्रातील एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केल्यास ग्राहकांना होणार ‘हा’ मोठा फायदा..!

अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी ओला आणि उबेर यांनी महाराष्ट्रात अॅग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केला आहे. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांत परवान्याबाबत निर्णय होणार आहे. * परवान्यासाठी अर्ज केला राइड-हेलिंग सेवा पुरवठादार ओला आणि उबेर यांनी अॅग्रीगेटर परवान्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य … Read more

Caste certificate case : खासदार ‘नवनीत राणा’ यांच्या अडचणीत वाढ

मुंबई – जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यांनी केलेला दोष मुक्ततेसाठीचा अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावत शिवडी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केलले अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचे स्पष्ट करत वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे नवनीत राणा यांच्यासमोरील अडचणी वाढणार … Read more

शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

Anil Deshmukh : खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयाला अर्ज

मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले (Former Home Minister Anil Deshmukh) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र या अर्जावर येणाऱ्या 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए … Read more

आ. गोरे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

सातारा (प्रतिनिधी) – मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद ऐकून प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी हा अर्ज फेटाळला. त्यामुळे जामीन अर्जावरील … Read more