satara | मतदानादिवशी नियुक्त महिला कर्मचाऱ्यांना सोयीस्कर ड्युटी द्या

दहिवडी, (प्रतिनिधी) – माण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महिला कर्मचारी यांना घेण्यात आले आहे. या महिला कर्मचाऱ्यांना सोयीने राहत्या गावात किंवा जवळ ड्युटी देण्यात यावी. तसेच निवडणुकीच्या मतदानादिवशी त्यांची प्रवास व इतर बाबतीत गैरसोय होऊ नये असे नियोजन व्हावे, अशी मागणी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने माण-खटावच्या प्रांत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला … Read more

पुणे जिल्हा : शिरूर शिक्षक पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी थोरात

कार्यकारी संचालकपदी बाळासाहेब निर्वळ टाकळी हाजी : शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी रमेश थोरात तसेच कार्यकारी संचालकपदी बाळासाहेब निर्वळ यांची संचालक मंडळाने निवड केली. मावळते तज्ज्ञ संचालक रामदास उगले व कार्यकारी संचालक नवनाथ निचित यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर दोघांची निवड करण्यात आली. त्याबद्दल अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक … Read more

पुणे जिल्हा : अखेर नेरे पतसंस्थेवर प्रशासक नियुक्‍त ;कायद्याच्या अंमलबजावणीत कसूर

भोर – सहकार कायद्याच्या अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ सोमवार (दि. 9) ऑक्‍टोबर 2023 च्या आदेशान्वये बरखास्त करण्यात आले असून, अखेर गुरुवारी (दि. 12) पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती भोरचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली. भोर येथील … Read more

Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली. डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत. डॉ. मृणालिनी … Read more

रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी महिला ; जया वर्मा सिन्हा आज पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी एका महिलेचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. ‘जया वर्मा सिन्हा’ या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अत्यंत संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले होते. ओडिशा दुर्घटनेच्या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते.  त्याच जया वर्मा सिन्हा यांची  रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि … Read more

मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सरन्यायाधीशांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : राज्यातल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयाने दाद मागायची असल्यास नवी याचिका करण्यास सांगितले … Read more

रामदास कदमांचा राऊतांवर निशाणा; म्हणाले,”संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही दोघांनाही अश्लील”

मुंबई :  मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर  आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, … Read more

Congress : माणिकराव ठाकरेंवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी तेलंगणा राज्याचे नवे पक्षप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर विद्यमान पक्ष प्रभारी माणिकम टागोर यांना गोव्याच्या प्रभारीपदी हलविण्यात आले असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने बुधवारी सांगितले आहे. “कॉंग्रेस अध्यक्षांनी तात्काळ प्रभावाने माणिकराव ठाकरे यांची तेलंगणाचे पक्ष प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे,’ असे कॉंग्रेसचे … Read more

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी विनय गौडा यांची नियुक्ती

सातारा  – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची राज्य शासनाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुणे येथील सहनोंदणी महानिरीक्षक डी. एस. खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. विनय गौडा 2015 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात नंदूरबार … Read more

‘शाजी प्रभाकरन’ यांची All India Football Federation च्या महासचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली – दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि क्रीडा प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ( Shaji Prabhakaran appointed new secretary general of AIFF ) ही नियुक्‍ती एआयएफएफच्या नवनियुक्त समितीने आज जाहीर केली आहे. एआयएफएफचे नवे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या अध्यक्षाखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more