गगनभरारी! “आरतीची लेखापरीक्षक पदाला गवसणी”; रायगडमधील म्हसाळा नगरपरिषदेत नियुक्‍ती

शिक्रापूर असोसिएशन सत्कार करणार शेरखान शेख शिक्रापूर – वडील होमगार्ड तर आई मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात एकुलत्या एक असलेल्या आरती राधाकृष्ण केंडे (सध्याच्या आरती महेश ब्राम्हणे) यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच नगरविकास खात्यात लेखा परीक्षक म्हणून म्हसाळा नगरपरिषदेत (जि. रायगड) येथे नियुक्‍ती झाली. त्यांच्या यशाचे शिक्रापूरात कौतुक होत आहे. शिक्रापूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा … Read more

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ‘डॉ. अपूर्वा पालकर’यांची नियुक्ती

मुंबई  : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने डॉ. पालकर यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना आज प्रसिद्ध केली आहे. डॉ. पालकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजेसच्या संचालक पदावर 2018 पासून … Read more

कॉंग्रेसच्या प्रसिद्धी विभाग प्रमुखपदी जयराम रमेश यांची नियुक्ती

नवी दिल्ली – कॉंग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी व प्रचार विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रणदीप सुर्जेवाला यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सरचिटणीस, प्रसिद्धी आणि मीडिया प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुरजेवाला यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे तथापि ते कर्नाटकचे … Read more

डॉ. संजीव सोनवणे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी निवड

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रा. सोनवणे हे बुधवारी (दि.1 जून) प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. त्यानंतर राज्यपालांनी प्रभारी कुलगुरू म्हणून … Read more

सुप्रीम कोर्टात पाच वर्षांनंतर प्रथमच अल्पसंख्यक न्यायाधिशाची नियुक्ती

नवी दिल्ली – देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश सुधांशु धुलिया आणि गुजरात हायकोर्टाचे जज जमशेद पारीदवाला यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणनू नियुक्ती झाली. केंद्र सरकारने त्यांच्या नावांची शिफारस झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही जारी केली आहे. हे नवीन न्यायाधिश सोमवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्‍यता आहे. … Read more

Pune | अतिरिक्त आयुक्तपदी विलास कानडे यांची नियुक्ती

पुणे : महापालिकेच्या रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक सेवा निवृत झाल्यानंतर या पदाचा पदभार कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नगरविकास विभागाने कानडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढत या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे. महापालिकेतील सेवा ज्येष्ठतेनुसार, पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी हे पद … Read more

कर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्त्या 15 दिवसांत होणार – दत्तात्रय भरणे

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये गट ‘क’ साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये सन 2019 मध्ये कर सहायक,लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती … Read more

राज्य शिक्षक सेना संघटनेच्या सल्लागारपदी ऍड. देविदास शिंदे यांची नियुक्ती

पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी ऍड. देविदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 15 डिसेंबर रोजी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या आदेशाने शिंदे यांची राज्य विधी सल्लागार या पदावर नियुक्ती केली आहे. याप्रसंगी राज्य समन्वयक नितीन चौधरी, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, विभागीय सचिव छाया कोळी, … Read more

कॉंग्रेस प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच राज्यातील प्रवक्‍त्यांची नियुक्ती केली असून त्यात तिवारी यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे. गोपाळ तिवारी हे 10 वर्षं अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, हरीयाना या सारख्या विविध राज्यात कॉंग्रेस पक्षाचे … Read more

कल्पेश यादव यांची युवासेना सहसचिव पदी नियुक्ती

पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर कार्यरत असणारा युवा चेहरा म्हणून ओळख असलेल्या कल्पेश यादव यांची युवासेनेच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या … Read more