पुणे जिल्हा | दौंडच्या भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी

देऊळगावराजे, (वार्ताहर)- दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील अधिकारी शेतकऱ्यांना अश्‍लील भाषा व दमदाटी करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कार्यालयामध्ये शेतकरी जमिनीची मोजणी हद्द कायम करणे, जुने नकाशे, फेरफार, शेती संबंधित सर्वच कागदपत्रे काढण्यासाठी येतात. त्यामुळे कायम शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. याच कामानिमित्त पूर्व भागातील शेतकरी तेथे गेले असता वरिष्ठ अधिकारी यांनी शेतकऱ्याला दमदाटी केली … Read more

“महावितरणच्या मनमानीविरोधात पुढे या”-आमदार जगताप

भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण मोडण्याचा संकल्प – आमदार जगताप सासवड – पुरंदर तालुक्‍यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता विरोधात दि. 3 जुलैपासून पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप सासवड येथील शिवतीर्थावर उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील नागरीक, शेतकरी, व्यावसायिक आदी ज्यांच्या महावितरणबाबत काही तक्रारी, अडचणी असल्यास त्यांनी पुरंदर कॉंग्रेसीच्या कार्यालयात तसेच माझ्या कार्यालयात लेखी … Read more

पुण्यात खासगी कॅब कंपन्यांची मनमानी सुरूच

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – रिक्षाचालकांच्या मनमानीला कंटाळून अनेकांनी खासगी कॅब सेवेला प्राधान्य दिले आहे. परंतु आता खासगी कॅब कंपन्या आणि चालकांची देखील मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जास्त पैसे आकारणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब न मिळणे, असे प्रकार सुरू झाले असून याबाबत नागरिक संताप व्यक्‍त करत आहेत. दुसरा शनिवार, रविवार, … Read more

चालक वाहकांना सलग तीन मुक्कामी ड्युटी; इस्लामपूर आगारातील मनमानी

इस्लामपूर (विनोद मोहिते) – देशभर कोविड ची महामारी सुरू असताना लांब पल्ला ड्युटी साठी चालक वाहकाना सलग तीन दिवसाच्या मुक्कामी ड्युटी साठी पाठवून कामगारांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार इस्लामपूर आगारात सुरू आहे. हा प्रकार बंद न झाल्यास काळ्या टोप्या घालून आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिला आहे. या … Read more

तरुणाईचे स्वातंत्र्य की स्वैराचार

सध्या मुला-मुलींना खूप स्वातंत्र्य  ( Freedom of youth ) दिले जाते. तारुण्य हे उपभोग्यासाठी असते, असे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे दारू, सिगारेटसारखी व्यसने मुलींमध्येही वाढताना दिसत आहेत. पण, स्वातंत्र्य ( Freedom of youth ) म्हणजे काय आणि स्वैराचार म्हणजे काय ( Freedom of youth or arbitrariness ) याची सीमारेषा ओळण्याची गरज आहे. कारण, स्वैराचार … Read more

अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच करोनाचा फैलाव

आमदार मोहिते प्रशासनावर भडकले ः लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप राजगुरूनगर (प्रतिनिधी) – सरकारी नियम न पाळणाऱ्या एमआयडीसीमधील कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. सरकारी प्रशासनाच्या आणि कंपनी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्‍यात करोना थैमान घालत आहे. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता अधिकाऱ्यांनी मनमानी निर्णय घेतल्याने सर्वत्र करोनाबाधितांची … Read more