हेल्दी पावसाळा : आपला पावसाळा हेल्दी व्हावा यासाठी काही टीप्स…

उन्हाळ्याच्या काळात उष्णता सहन केल्यानंतर, पावसामुळे भरपूर आराम मिळतो, परंतु हवामानातील या बदलाबरोबरच या हंगामात आजारही होतात. म्हणूनच, सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपण अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोविड 19 मुळे पसरलेल्या साथीच्या आजारांमुळे भारताची सुरू असलेली लढाई, पावसाळ्याच्या सुरुवातीस लोकांना संसर्ग होण्याचा अतिरिक्‍त धोका वाढतो. सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर … Read more

निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

Holi 2024 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग ! असा करा घरच्या घरीच रंग तयार…

पुणे – रंगांचा उत्सव होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत.  प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण यावर्षी २५ मार्च (सोमवार) रोजी साजरा केला जाईल. तुम्हीही यंदा होळी साठी सज्ज झाला असाल. वास्तविक रंग तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि केसांचे नुकसान होऊ शकते.  या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरीच नैसर्गिक … Read more

तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता, तर ‘ही’ स्पेशल बातमी नक्की वाचा…

प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

care of feet in winter : थंडीत “अशी” घ्या भेगांपासून पायाची काळजी

care of feet in winter  – तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर साफसफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी … Read more

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती पावले चालावे? जाणून घ्या…

आपण सगळे निरोगी राहण्यासाठी योगाचा, व्यायामाचा अवलंब करतो.  बरेच लोक जिममध्ये जाऊन घाम गाळतात.  परंतु याउलट दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते.  होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. यामुळे रक्ताभिसारण उत्तम होत असल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता कमी असते.  मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला … Read more

Pimple Removal : चेहऱ्यावरील मुरुमं घालवा ‘या’ घरगुती उपायांनी; ट्राय करा लेटेस्ट टिप्स….

Skin Care Pimple Removal : चेहऱ्यावर दिसणारे मुरुम केवळ वाईटच दिसत नाहीत, तर ते बऱ्याच त्रासांना कारणीभूतही ठरतात. मोठ्या मुरुमांप्रमाणे चेहऱ्यावर येणारी छोटी मुरुमं किंवा फुटकळी खूप वेदनादायक असतात. ज्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच, पण कुरूप डागही पडतात. अशा परिस्थितीत या मुरुमांना कमी करण्यासाठी आणि त्यांना बाहेर येण्यापासून रोखण्याची गरज असते. काही जण यांना तारुण्यपिटीकाही … Read more

सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

पचनक्रिया सुधरवायची आहे, तर “पवनमुक्तासन’ नक्की करून पहा

पुणे – पवन म्हणजे वायू हा वायू मुक्‍त करणारे म्हणजेच गॅसेसचा त्रास दूर करणारे. सहज सुलभ आसन म्हणजे पवनमुक्‍तासन (Pavanamuktasana) . हे शयनस्थितीतील आसन करायला सोपे आहे. पाठीवर सरळ झोपून पाय ताठ ठेवून दोन्ही पाय जुळवलेल्या अवस्थेत गुडघ्यात वाकवून त्या पायांचा पोटावर दाब द्यायचा. आणि हाताची घडी गुडघ्यावर घालून हनुवटी जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्यायची. आपले … Read more