सोप्प नव्हतं नवाझुद्दीनला ‘ही’ भूमिका साकारणं… लूकसाठी घेतली तब्बल ६ महिने मेहनत

मुंबई – बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी दरवेळी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच नवाझुद्दिन ‘हड्डी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात तो तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा फस्ट लुक समोर आल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या चित्रपटातील हा लुक देण्यासाठी त्याला तब्बल ६ महिने लागल्याचा खुलासा निर्मात्या … Read more

शहरातील नाट्यप्रयोग होऊ लागले रद्द

कलाकारांचे हाल : कोविडमुळे रसिकांचा प्रतिसाद घटल्याचा परिणाम पिंपरी – कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास नऊ महिने नाट्यगृहांना टाळे होते. गतवर्षी डिसेंबरपासून पिंपरी-चिंचवडमधील नाट्यप्रयोगांना सुरूवात झाली. गेले तीन महिने नाट्यप्रयोग व्यवस्थित सुरू होते. मात्र, आता कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रसिकांचा प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे नाट्यप्रयोग रद्द होऊ लागले आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात … Read more

पुरस्कारांची रक्कम थेट खात्यात – अमित देशमुख

मुंबई – कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करून कलावंतांचा यथोचित गौरव राज्य शासनातर्फे करण्यात येतो. मात्र यावर्षी कोविड-19 या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आयोजनांवर आलेल्या बंधनांमुळे सांस्कृतिक कार्य विभागाला विविध पुरस्कार प्रदान सोहळे सध्या आयोजित करता येणे … Read more

अहमदनगर : जामखेड येथे कलावंतांचे तहसीलवर आंदोलन

जामखेड (प्रतिनिधी) – मागील 8 महिन्यांपासून करोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन होते. मागील तीन महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रम सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी लोककलावंतांनी वाद्यांच्या गजरात तहसील … Read more

नाट्य, चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम

कार्यक्रम, नाटक, मैफिली बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर  पिंपरी – करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने कलाकार हतबल झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, मैफिली बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. दूरचित्रवाहिनीवरील मालिका सुरू झाल्या असल्या तरीही अद्याप नाट्यगृह व चित्रपटगृह सुरू न झाल्याने नाट्यकलावंत आणि चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम … Read more

राज्यातील रंगमंदिरे खुली करण्यासाठी कलाकारांचे आंदोलन

पुणे – राज्यातील रंगमंदिरे खुली करावी या आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. … Read more

प्रसिद्ध कलातज्ज्ञ कपिला वात्स्यायन यांचे निधन

नवी दिल्ली – इतिहास, वास्तुकला आणि भारतीय शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारांमधील प्रसिद्ध तज्ज्ञ कपिला वात्स्यायन यांचे आज दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या.  गुलमोहर एन्क्‍लेव्ह येथील घरी सकाळी 9 वाजता कपिला वात्स्यायन यांचे निधन झाले, असे ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’चे सचिव कंवल अली यांनी सांगितले.  कपिला वात्स्यायन या ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’च्या आजीव विश्‍वस्त … Read more

कलाकार आंदोलनाच्या पवित्र्यात

नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने आर्थिक कोंडी  पिंपरी –  करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने नाट्य, लावणी कलावंत, नृत्य कलाकार, लोककलावंत, पडद्यामागील कलाकारांची सध्या आर्थिक कोंडी झाली आहे. नाट्यगृहे सुरू करावी, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, या मागण्यांसाठी कलाकारांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता कलाकार पारंपारिक … Read more

लॉकडाऊनमुळे कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड

कीर्तनकार, क्‍लासवाले, संगीत विशारदांवर आली हेल्पर म्हणून काम करण्याची वेळ जाधववाडी – करोना महामारीने आज संपूर्ण विश्‍वाला मोठे आर्थिक ग्रहण लावले आहे. कित्येकांवर आपली नोकरी, धंदा, व्यवसाय यावर पाणी सोडून रोजगारासाठी दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. संगीत, कला, शिक्षण, क्‍लास, कीर्तन या क्षेत्रांना मरण नाही. त्यांच्यावर कधी उपासमारीची वेळ येणार नाही. अशी बऱ्याच जणांचा समज … Read more

टिव्ही कलाकार सेजल शर्माची अत्महत्या

मुंबई : टिव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या सेजल शर्मा या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड भागातील राहत्या घरीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आले. सेजल शर्माला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी संगितले. पोलिसांनी एक सुसाइड नोट जप्त केली आहे, त्यात … Read more