अहमदनगर – आ. आशुतोष काळेंच्या सहकार्यातून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी वाहन सेवा

कोपरगाव – मागील तीन वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी या ठिकाणी एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये मतदारसंघातील रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचारासाठी देखील मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध लाभदायी … Read more

अहमदनगर – आशुतोष काळेंनी महाआरती करून दिल्या शुभेच्छा

कोपरगाव   – अयोध्येच्या रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य-दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू श्रीराम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला सोमवारी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला मतदार संघातील नागरिकांनी प्रतिसाद देत विविध धार्मिक कार्यक्रमांचे … Read more

अहमदनगर – आशुतोष काळेंकडून नगरपरिषदेचा भार हलका

कोपरगाव –  कोपरगावकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करताना सर्वसामान्य कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास पण करायचा व कोपरगावकरांवर अतिरिक्त कराचा बोजा देखील पडू द्यायचा नाही, अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडून आ. आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी नगरविकास विभागाकडून मिळवून दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा … Read more

अहमदनगर – आरोग्य विभागाने सतर्क रहावे; आ.आशुतोष काळेंच्या आरोग्य विभागाला सूचना

कोपरगाव – कोरोनाच्या नव्या ‘जेएन1′ व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. हा नवा व्हेरिएंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून आयुष्यमान भारत योजनेच्या अंलबजावणीचा देखील वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या जे एन १ या नवीन व्हेरिएंटचा मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत असलेल्या … Read more

अहमदनगर – आदर्श राज्यघटनेमुळे भारत बलशाली राष्ट्र

आ. आशुतोष काळे कोपरगाव  – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तुत्व जेवढे महान होते, तेवढेच त्यांचे विचारही महान होते. त्यांच्या विचारात जीवन जगण्याची कला दडलेली होती. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अजोड योगदानातून आपल्या देशाला आदर्श राज्यघटना मिळाली. त्यामुळे बलशाली राष्ट्र निर्माण होउ शकले. त्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञ राहून त्यांच्या स्वप्नातील भारत देशाच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांशी नेहमी कटिबद्ध रहावे, … Read more

अहमदनगर – उर्वरित पिक विमा धारकांना अग्रीम पिकविमा रक्कम तातडीने द्या   

कोपरगाव  – आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पीकविमा कंपनीला आगाऊ पीकविमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून, कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा आगाऊ पीकविमा रक्कम मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पीकविमाधारक शेतकऱ्यांना तातडीने आगाऊ पीकविमा रक्कम मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे … Read more

कराडमध्ये घुमणार आज मनोज जरांगे-पाटलांची गर्जना

कराड – मराठा समाजाचे क्रांतिसूर्य मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्या (शुक्रवार, दि. 17) सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयकांची बैठक नुकतीच झाली. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आल्या असून, सभेची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. मराठा समाजातील आबावलवृद्धांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे कराडला येत … Read more

अहमदनगर – सरकारविरोधात अवमान याचिका दाखल

कोपरगाव  – मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानासुद्धा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने राज्य सरकारने 30 ऑक्‍टोबर 2023 रोजी पुन्हा जायकवाडीला पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसून हा उच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे याचिकादार काळे कारखान्याचे सभासद सुनील कारभारी शिंदे यांनी राज्य सरकार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ … Read more

अहमदनगर – “निळवंडे”च्या पाण्यासाठी रांजणगावात शेतकऱ्यांचे उपोषण

कोपरगाव – निळवंडे लाभक्षेत्र हे आवर्षण प्रवर्षणग्रस्त असून कायमच हा भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे. निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. परंतु तालुक्‍यातील एकही पाझर तलाव या पाण्याने भरला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याने परिसरातील सर्व गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरुन देण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथे प्रातिनिधिक स्वरूपात सहा जणांनी गुरूवारपासून … Read more

कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

कोपरगाव -कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती असून देखील कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्‍यांच्या यादीत कोपरगाव मतदार संघाचा देखील समावेश करावा, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन शासनाने मतदारसंघाचा देखील दुष्काळाच्या यादीत समावेश केला असल्याची … Read more