पुनीत बालन ग्रुपच्या पाठिंब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी – ऋतुजा भोसले

पुणे (प्रतिनिधी) :- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकविण्यात आला. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. यासाठी माझ्या कुटुंबियाबरोबरच बरोबर पुनित बालन सरांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे हे सुर्वपदक मिळवणे शक्य झाल्याचे उद्गगार सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिने काढले. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या स्टार खेळाडू ऋतुजा … Read more

Asian Games 2023 : स्पर्धेत चीनची मनमानी? धावपटू ज्योतीसह भालाफेकपटू नीरज-किशोर यांचे चोख प्रत्युत्तर…

हांगझोऊ –  चीनला ज्या तंत्रज्ञानाचा अभिमान होता, त्या तंत्रज्ञानाची हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत खिल्ली उडवली जात आहे. आतापर्यंत या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंसोबत असे तीन वेळा घडले आहे, जेव्हा त्यांना तांत्रिक बिघाडांमुळे किंवा तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे पेच सहन करावा लागला आहे. धावपटू ज्योती याराजीपासून ते भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि किशोर जेना याच्यासोबत चिनी अधिकाऱ्यांनी(पंच) … Read more

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

मेरठ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अंगदपूर गावातील अखिल शेओरानने उधार घेतलेली रायफल घेऊन सरावाला सुरुवात केली. त्यामुळेच सुरुवातीला अखिलची चाचणी चुकली आणि नंतर शेतकरी वडील रवींद्र शेओरान यांनी कर्ज काढून आपल्या मुलासाठी रायफल मिळवली. यानंतर अखिलने सुवर्णासह इतर पदकांची लयलूट केली. मेरठच्या गॉडविन स्कूलमध्ये शिकत असताना अखिल शेओरानने रायफलचा सराव सुरू … Read more

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

हांग्‌ चौऊ – भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पूल ‘ए’ सामन्यात आज(गुरूवारी) जपानचा 4-2 असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पूल ‘ए’मधील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. याआधी सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 16-0 असा धुव्वा उडवल्यानंतर भारताच्या हॉकी संघाने मंगळवारी सिंगापूरवर 16-1 असा दणदणीत विजय साकारला होता. भारताकङून अभिषेकने दोन (13 आणि 48 … Read more

Asian Games 2023 : भारताच्या महिला हॉकी संघाचा दणदणीत विजय

हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीत भारताच्या महिला संघाने पुरुष संघाच्याच कामगिरीचा कित्ता गिरवताना बुधवारी सिंगापूरवर तब्बल 13-0 असा विजय मिळवला. भारताच्या संगीता कुमारीने गोलची हॅट्ट्रिक साधताना सिंगापूरच्या बचावाला कमकुवत ठरवले. भारतीय महिला हॉकी संघाने सिंगापूरचा धुव्वा उडवताना गोलचा वर्षाव केला. संगीता कुमारीने हॅटट्रिक साधली. तिला साथ देताना नवनीत कौरने दोन गोल केले. तसेच दीपिका, … Read more

Asian Games 2023 : अखेर 41 वर्षांचा दुष्काळ संपला; भारतीय संघाची घोडेस्वारीत ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी…

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. घोडेस्वारीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचत सुवर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान, हृदय छेडा, दिव्यकृती सिंग, अनुष अग्रवाल आणि सुदीप्ती हाजेला यांच्या भारतीय मिश्र संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. या चौघांनी मिळून घोडेस्वारीत इतिहास रचला आहे.कारण एशियन गेम्स … Read more

Asian Games : भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाचे शिबिर बंगळुरूत

बंगळुरू :- भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सराव शिबिर बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) होणार आहे. शिबीर संपल्यावर दोन्ही संघ चीनला रवाना होणार आहेत. सरस गुण व टक्केवारीमुळे भारताचे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीतील सामने खेळणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाचे शिबिर कमी दिवसांचे असेल तर, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखीलील संघाला स्पर्धेच्या … Read more

Asian Games : जिम्नॅस्टिकपटू दीपाला मिळणार सूट

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हीला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेता यावा यासाठी खास सुट दिली जाणार आहे. याबात भारतीय जिम्नॅस्टिक्‍स संघटनेने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला विनंती केली आहे. दुखापत व उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात लावण्यात आलेली बंदी यामुळे दीर्घ काळ ती खेळापासून तसेच प्रसिद्धीपासून ती दूर होती. चीनमध्ये होत असलेल्या आशियाई … Read more

Asian Games 2023 : भारताच्या प्रमुख फुटबॉल संघाला सहभागाची मिळाली मान्यता

नवी दिल्ली – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रमुख फुटबॉल संघ पाठविण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेला चीनमधील हॅंगझोऊ येथे येत्या 23 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. जाकार्ता येथे 2018 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला सहभागासाठी परवानगी मिळाली … Read more

Asian Games Trials : महाराष्ट्राच्या आतिषने ऑलिम्पिक विजेत्याला केले चीतपट; रवी दहियाचे स्वप्न भंगले

नवी दिल्ली – महाराष्ट्राचा अव्वल कुस्तीपटू आतिष तोडकर याने ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पियन कुस्तीपटू रवी दहिया याला आस्मान दाखवले. या सनसनाटी पराभवामुळे दहियाचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंग झाले. रविवारी पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये हा सर्वात मोठा व धक्कादायक निकाल ठरला. ऑलिम्पिक रजतपदक विजेता स्टार कुस्तीपटू रवी दहिया याला 57 किलो वजनी … Read more