T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सहज विजय, हेड-वॉर्नरनंतर कमिन्स-झाम्पा चमकले…

T20 World Cup 2024 (AUS vs ENG) :- टी-20 विश्वचषकाच्या 17 व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला 2021 च्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ही लढत चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या गट-ब सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान, अमेरिका सारखे संघ आपापल्या गटात गुणतालिकेत वर असताना मोठ्या, … Read more

#AUSvENG #Ashes 5th Test Day 1 | हेड, ग्रीनने ऑस्ट्रेलियाला सावरले

होबार्ट – प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावरही ट्रॅव्हिस हेडचे शतक व कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी मालिकेतील पाचव्या व अखेरच्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 6 बाद 241 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात तब्बल 30 षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने नाणेफेक जिंकत … Read more

#Ashes | ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी  – उस्मान ख्वाजाने फटकावलेल्या अफलातून शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस कसोटीत दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 416 धावांवर घोषित केला. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 5 षटकात बिनबाद 13 धावा केल्या आहेत. जॅक क्राऊली व हतीब हमीद प्रत्येकी 2 धावांवर खेळत आहेत. पहिल्या दिवशीच्या 3 बाद 126 धावांवरून … Read more

#Ashes #AUSvENG 2nd Test | ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या कसोटीवर पकड

ऍडलेड – ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडला पहिल्या डावांत 236 धावांवर गुंडाळले. यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 1 बाद 45 धावा करत 282 धावांची आघाडी घेतली. 2 बाद 17 धावांवरून पुढे खेळताना ज्यो रुट आणि डेव्हिड मलान यांनी सावध खेळी केली. या दोघांनी 138 धावांची भागीदारी करत संघाला दीडशे … Read more

#Ashes | इंग्लंड फॉलोऑनच्या छायेत, दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड 2 बाद 17

ऍडलेड – मान्रस लेबुशेनचे शतक व त्याला साथ देत कर्णधार स्टिव्हन स्मिथने केलेली अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 17 अशी अवस्था केली. इंग्लंडचा संघ अद्याप 456 धावांनी पिछाडीवर … Read more

#U19CWC : अतितटीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा इंग्लंडवर २ विकेटनी विजय

किम्बर्ली : मक्केंजिए हार्वेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा २ विकेटनी पराभव करत विजय संपादित केला आहे. AUSTRALIA WIN!!!!!!!!#U19CWC | #AUSvENG | #FutureStars — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 23, 2020 आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंड संघास प्रथम फंलदाजीस पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सलामीवीर … Read more

#Ashes 2nd Test : मार्नसने संधीचे सोने केले

लंडन – कसोटी सामन्यात खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू पाहात असतो. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन यानेही असेच स्वप्न पाहिले होते. आपला वरिष्ठ सहकारी स्टीव्ह स्मिथ जायबंदी झाल्यानंतर संघात स्थान मिळविलेल्या लाबुशेनने जबाबदारीने खेळ केला. त्यामुळेच त्याच्या संघास इंग्लंडविरूद्धच्या ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अनिर्णित ठेवता आला. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू स्मिथच्या गळा व मान याच्या मधोमध बसला. … Read more

#Ashes2019 2nd Test : इंग्लंडपुढे स्मिथला बाद करण्याचेच आव्हान

विजयी मालिका राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील लंडन – ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला झटपट बाद करणे हीच इंग्लंडच्या गोलंदाजांपुढील मुख्य समस्या असून त्यादृष्टीनेच जोफ्रा आर्चर या युवा गोलंदाजाकडे पाहिले जात आहे. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीस मुकलेल्या आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघाची बाजू वरचढ झाली आहे. या दोन संघांमधील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना आजपासून येथील लॉर्डस मैदानावर सुरू होत आहे. पहिल्या … Read more

#Ashes : नॅथन ठरला ‘शेर’, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 251 धावांनी विजय

बर्मिंगहॅम – ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळेच ऍशेस क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडला पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने सहा विकेट्‌स घेत त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. पॅट कमिन्सने 4 गडी बाद करीत त्याला चांगली साथ दिली. विजयासाठी 398 धावांचा पाठलाग … Read more

#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील लढतीच चित्र स्पष्ट…

लंडन – यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. क्रिकेट विश्वचषकात सातवा विजय मिळवत आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली आहे. विश्वचषक स्पर्धेत काल पार पडलेल्या अखेरच्या सामन्यानंतर गुणतालिकेत सुध्दा बदल पहायला मिळाला. भारताने श्रीलंकेला तर द.आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. कालच्या सामन्यानंतर भारत 15 … Read more