मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा; सराफाकडे 5 कोटी मागितल्याचा आरोप

Avinash Jadhav | Extortion case – मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ … Read more

मनसेचा टोलनाक्यावर राडा ! टोल न भरताच वाहने सोडली; पोलिसांनी धरपकड करताच दाखवला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ

मुंबई – आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी (Raj thackeray) पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यासंदर्भातील (Toll) आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे.ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी … Read more

टोलनाके जाळून टाकण्याच्या इशारानंतर मनसैनिक मैदानात; अविनाश जाधव पोहचले मुलुंड टोलनाक्यावर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाले असून मैदानात उतारल्याचे पाहायला … Read more

“लोकांचा आक्रोश परवडणार नाही…”; टोल दरवाढीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई – मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) मागील चार दिवसांपासून टोलदर वाढी विरोधात आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील सडकून टीका केली … Read more

मनसेच्या अविनाश जाधव यांनी अयोध्येत जावून घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे ठरवले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरे उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या … Read more

“सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे ‘हिंदू’ हा शब्दच विसरले आहेत”; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई : करोनाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही  दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र असे असतानाही ठाण्यामध्ये मसनेने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेत आंदोलन सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा अशी … Read more

मनसेचे अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे. कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी त्यांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आधी दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार … Read more

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

ठाणे – कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अर्ज केल्यानंतर ठाणे न्यायालयाने … Read more

मनसेचे अविनाश जाधव “तडीपार’

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. अविनाश … Read more

नितीन नांदगावकर यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय घाईत

मनसेचे ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया मुंबई : काही दिवसांपूर्वी नितीन नांदगावकर यांनी मनसेची साथ सोडत हाती शिवबंधन बांधून घेतले होते. नितीन नांदगावकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देत काही मनसेतील काही नेत्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले होते. यावर आता मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिला आहे. … Read more