रायगड प्रशासनाकडून वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; अनुचित घटना टाळण्यासाठी निर्णय

पुणे : पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद  करण्याचा आदेश काढण्यात आला होता. मात्र या आदेशाकडे वाहन चालक दुर्लक्ष करत घाटातून प्रवास  करत होते. त्यामुळे अखेर रायगड प्रशासनाने वरंधा घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द असणाऱ्या ठिकाणी मुरूम मातीचे ढिगारे लावून रस्ता वाहतुकीसाठी काल रात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, २२ … Read more

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात “who is dhangekar?” म्हणणारे चंद्रकांत पाटील निकालानंतर म्हणाले,”…

 पुणे  : राज्याचे राजकारण मागील एक महिन्यापासून पोटनिवडणुकाच्या भोवती फिरताना दिसले. दरम्यान, यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान पुणे  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना ‘हू इज धंगेकर’ म्हणत हिणवले होते. मात्र तब्बल ३ दशकानंतर भाजपचा कसब्याचा गड महाविकास आघाडीने हिसकावून घेतला. या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हिणवण्याला तीन शब्दात उत्तर … Read more

पुणे जिल्हा : जे काय ते एकदाच तळा;दुसऱ्यांदा तेच तेल टाळा !

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन पुणे – अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या आदेशानुसार खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे. पुनर्वापर केलेले खाद्यतेल आरोग्यास हानीकारक असते. अशा खाद्यतेलामध्ये टोटल “पोलर कंपाऊंड्‌स’ तयार होतात. यामुळे उच्च रक्‍तदाब, धमणीकाठिण्य, अल्झायमर, यकृताचे आजार होतात. हे लक्षात घेऊन खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन … Read more

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री शिंदे

पंढरपूर :- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या … Read more

“महिलांच्या कपड्यांवरुन किंवा वर्तनावरुन टिप्पणी करु नये”; सर्वोच्च न्यायालयाचा देशातील सर्वच न्यायाधीशांना सल्ला

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या कपड्यावरुन केलेल्या विधानावरुन देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यातच आता या मुद्द्यावरुन देशातील सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांनी संवेदनशील रहायचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा सल्ला दिला आहे. यावेळी महिलांच्या संबंधित कोणत्याही याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी पूर्वग्रहदूषित असेल अशी टिप्पणी करु नये, असे … Read more

गर्दी टाळण्याचे प्रयत्न…पीएमपीच्या आणखी 100 बसेस धावणार

पुणे  – करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आणखी 100 बसेस धावणार आहेत. सोमवारपासून बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे.   लॉकडाऊननंतर दि.3 सप्टेंबरपासून प्रवासी बससेवेला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात शहरातील 190 मार्गांवर सुमारे 400 बसेस सोडण्यात येत होत्या. कालांतराने प्रवाशांची संख्या वाढल्याने बसेसची संख्या देखील वाढविण्यात आली असून, सध्या सुमारे हजाराच्या आसपास बसेस … Read more

कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता

ठाणे  : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाणे जिल्हयातील कल्याण आर्ट गॅलरी येथील कोविड … Read more

सँडपेपर, डिटर्जंट आणि चक्क तंबाखूच्या वापराने पावसाळ्यातील कार अपघात टाळा!

पुणे – पावसाळा संपत आला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या मोसमात वाहने चालविताना विशेषतः चारचाकी वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागते. पाऊस चालू असताना तुम्ही कारमधून जात असेल तर पावसात भिजण्याचा धोका नसतो, पण समोरच रास्ता, वाहने नीट दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. या समस्येवर सँडपेपर, डिटर्जंट पावडर आणि चक्क … Read more