लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारमध्ये राजकीय उलटफेर सुरूच ; आता राजद-काँग्रेस आघाडीत जुना मित्र परतला…

Bihar Politics ।

Bihar Politics । बिहारमध्ये विरोधी बाकांवर असणाऱ्या महाआघाडीला जुना मित्र पुन्हा मिळाला. राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या त्या महाआघाडीत विकासशील इंसान पक्ष (व्हीआयपी) सहभागी झाला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बिहारमध्ये विरोधकांना बुस्टर मिळाला आहे. राजद, कॉंग्रेसच्या महाआघाडीत व्हीआयपी सहभागी Bihar Politics । राजदचे नेते तेजस्वी यादव आणि व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी यांनी … Read more

पुणे जिल्हा : कातकरी समाजास मूळ प्रवाहात आण्याचे प्रयत्न

अमित बेनके :जुन्नर तहसील कार्यालयात शासकीय कागदपत्रे वाटप जुन्नर – आदिवासी कातकरी ठाकर समाज हा कष्टकरी असून शेतकर्‍यांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारा; परंतु वंचित राहिलेला समाज आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्याकरिता शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे पुरावे नसल्याने शासकीय लाभांपासून वंचित असलेल्या या समाजबांधवांना शासकीय लाभदायी योजनांचा लाभ मिळून देण्याकरिता आमदार अतुल बेनके यांच्या सूचनेनुसार … Read more

पुणे जिल्हा : फडणवीसांच्या पाठीत ठाकरेंनी खंजीर खुपसला

नारायणगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात नारायणगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शिकले नाही; परंतु ठाकरे यांना आता कोणी विचारत नाही, अशी घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. “शिरूर लोकसभा प्रवास’ योजनांतर्गत महाविजय 2024 अंतर्गत “घर चलो’ अभियान कार्यक्रमातर्गंत बावनकुळे गुरुवारी (दि. 12) … Read more

पुणे जिल्ह्यात पावसाने मेंढपाळ परतीच्या वाटेवर

आठ महिन्यांची भटकंती संपवून घरी : मेंढ्यांच्या जिवावर वर्षभराची रोजीरोटी यवत – दौंड तालुक्‍यात सलग दोन दिवस पावसाच्या सरीवर सरी बरसत आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्याने यवत भागात आता मेंढपाळ परतीच्या मार्गाने जाताना दिसत आहेत. दीपावलीनंतर मेंढपाळ चाऱ्याच्या शोधात घरदार सोडून इतर तालुक्‍यात जिल्ह्यात जातात. मेंढ्यांना आठ महिने खाद्य उपलब्ध होईल, या आशेवर तो रानोमाळ … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा अध्यक्षांनी निर्णय घेत ‘राहुल गांधीं’ना परत दिली त्यांची ‘खासदारकी’

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनाव मानहानी दावा प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हा निर्णय देत राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानंतर राहूल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी परत देण्याचा निर्णय … Read more

भारतीय नौदलाच्या ‘खंजर’ने वाचवले ३६ मच्छीमारांचे प्राण; समुद्रात भरकटले होते ३ मासेमारी जहाज

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात भारतीय मच्छीमार भरकटले असताना त्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदल धावून आल्याची घटना समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात तामिळनाडू किनाऱ्यापासून १३० नॉटिकल मैल अंतरावर ३ मासेमारी जहाज अडकले होते. भारतीय नौदल जहाज ‘खंजर’ने या जहाजांवरील ३६ भारतीय मच्छिमारांना सुखरूप परत आणले. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार,”खराब हवामान, इंधन, तरतुदी आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन … Read more

अज्ञात शक्ती शुभांगी पाटील यांच्या पाठीशी

नगर  – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळी राजकीय नाट्य घटत असतांना दुसरीकडे उमेदवारांनी प्रचारात चांगलाच जोर धरला आहे. आज महाविकास आघाडीच्या उमदेवार शुंभागी पाटील नगर शहरात आल्या असता कॉंग्रेसच्या एक पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या पाठिशी नगरची अज्ञात शक्‍ती असल्याचे वक्‍तव्य केल्याने या निवडणुकीतील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे. प्रचार सभेत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस … Read more

वारकरी बांधव परतीच्या वाटेवर

आळंदी : कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी राज्यभरातून पाच लाखांवर भाविक अलंकापुरीत दाखल झाले होते. रविवारी (दि. 20) कार्तिकी एकादशी झाल्यानंतर द्वादशीला (दि. 21) बहुतांश भाविक सकाळी द्वादशीचे भोजन करून आपापल्या गावी परतले. तर आज (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा झाल्यानंतर लाखो भाविक हे गावी परतले. संत ज्ञानेश्‍वर … Read more

“सुनक यांना भारतात बोलवा, त्यांचं अपहरण करा अन्…”; ‘कोहिनूर’ हिरा भारतात आणण्यासाठी ‘या’ उद्योजकाचा सल्ला

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन केले. ब्रिटनमध्ये गेल्या २१० वर्षांतील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेल्या सुनक यांनी मंगळवारी राजे चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन पदाची सूत्रे स्वीकारली. सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाल्यापासूनच भारतामध्येही आनंदनाचे वातावरण आहे. सुनक पंतप्रधान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिटनकडे असलेल्या कोहिनूर … Read more

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

नवी दिल्ली – युक्रेनने पूर्व युक्रेनमध्ये पाच रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार युक्रेनवर हे हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात 40 हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि 10 नागरिक ठार झाले आहेत. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच … Read more