Sports In Pune : बालेवाडीत ज्युनिअर प्रिमियर लीगचे आयोजन…

पुणे – टॉट्स मॅगझिन तर्फे १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान बालेवाडी येथे ४ ते १४ वयोगटातील मुला मुलीं करता ज्युनियर प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले असून या मधे ५०० मुला मुलींनी नाव नोंदणी केली असल्याचे टॉट्स मॅगझिनच्या संस्थापिका लवलीन अलीमचंदानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही लीग दीर्घकालीन असून फेब्रुवारी ते मे पर्यंत सुरू राहणार आहे. … Read more

सामाजीक सुरक्षा विभागाची बालेवाडीत मोठी कारवाई; सात राज्यातील दहा मुलींची सेक्स रॅकेटमधून सुटका

पुणे – पुणे पोलिसांच्या सामाजीक सुरक्षा विभागाने बालेवाडी परिसरात छापेमारी करत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल दहा मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर पाच दलालांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच कोरेगाव पार्क परिसरात एका तारांकीत हॉटेलमध्ये सापळा लावून राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेकिस्तानच्या मुलींना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईमुळे … Read more

बालेवाडीत भरणार ‘राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन’; देशभरातील ४०० विद्यार्थी आणि २०० शिक्षक होणार सहभागी

पुणे – मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे व १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मार्फत दरवर्षी कोणत्याही एका राज्याच्या मदतीने चक्राकार पध्दतीने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. यंदा महाराष्ट्रात बालेवाडी येथे २६ ते ३० … Read more

Pune : बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे उद्या आयोजन – क्रीडामंत्री संजय बनसोडे

मुंबई :- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Pune : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडीत आयोजन

पुणे :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे सोमवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश … Read more

पुणे : सुस, म्हाळुंगे, बालेवाडीत लवकरच पालिकेचे पाणी

पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस, म्हाळूुगे आणि बालेवाडीला लवकरच महापालिकेचे पाणी सर्वात आधी मिळणार आहे. या 34 गावांसाठी टप्प्याटप्प्याने आराखडे तयार करून त्यांना जलवाहिनीद्वारे समान पाणी योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या तीन गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास मान्यता देऊन लगेचच या योजनेचे काम … Read more

Pune : बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे रचनेचा ‘घोळ’

औंध –पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून औंध, बाणेर, बालेवाडी, सूस म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. नैसर्गिकरित्या बालेवाडीचा औंध गावाशी कोणत्याही पद्धतीने संबंध येत नसताना प्रभाग रचनेमध्ये बालेवाडी व औंध ही दोन गावे जोडण्यात आली आहेत. तसेच बाणेर, सूस, म्हाळुंगे या गावांमध्ये पुणे महानगरपालिकेतील एकमेव दोन नगरसेवकांचा प्रभाग करण्यात आला. ही रचना राजकारणातून की … Read more

पुणे | नगरसेवक अमोल बालवडकरांतर्फे बालेवाडीत 7 हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप

पुणे :- नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यातर्फे बालेवाडी संजय फार्म येथे बाणेर बालेवाडी महाळुंगे सुस परिसरातील सात हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमोल बालवडकर म्हणाले की “दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर … Read more

पुणे : खेळाडूंसाठीही “पुण्यदशम” बससेवा

पुणे – शहरातील खेळाडूंना बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सरावासाठी जाण्यास पुरेशा बस नसल्याने “पुण्यदशम’ बससेवेच्या दिवसातून आठ फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या क्रीडा समितीत या प्रस्तावास मंजुरी दिली असून स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात ही सेवा सुरू आहे. महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने शहरात … Read more

बाणेर बालेवाडी येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस लहान मुलांना गोल्ड मेडल देऊन साजरा…

औंध – देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्र. ९ मधील ७५ सोसायटींमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. भारताने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी १ सुवर्ण पदकासह ईतर पदके जिंकली व देशाची मान उंचावली नव्या पिढीने विविध खेळात सहभागी झाले पाहिजे व देशाला अनेक सन्मान मिळवून द्यायला हवे, यासाठी ७५ सोसायटी मधील … Read more