कॉकटेल पिण्याचे चॅलेंज आले अंगलट; बारमधील सर्व कॉकटेल एकाच बैठकीत पिल्याने गमावला जीव

किंग्जस्टन (जमैका) – कुटुंबियांसमवेत जमैकाला सुटी घालवायला गेलेल्या ब्रिटनच्या एका व्यक्तीला कॉकटेल पिण्याचे एक चॅलेंज महागात पडले आहे. एका बैठकीमध्ये 21 कॉकटेल पिण्याचे चॅलेंज पूर्ण करण्याच्या प्रयत्नात या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. टिमोथी साऊदर्न असे या 53 वर्षीय व्यक्तीचे नाव असून बारमधील सर्व कॉकटेल एकाच बैठकीत पिऊन टाकण्याचे चॅलेंज त्यांनी स्विकारले होते. ठरल्याप्रमाणे … Read more

एलिफंट अ‍ॅण्ड को. रेस्टॉरंड अ‍ॅण्ड बारवर गुन्हेशाखेची कारवाई

पुणे – येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये चालणार्‍या साउंडसिस्टिम गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी गौरीशंकर कल्यानण बंगाले, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यु, निलांजली सोसायटी येथील एलिफंट अ‍ॅण्ड को. रेस्टॉरन्ट अ‍ॅण्ड बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेने 4 लाखांचे साऊंड सिस्टिम जप्त केली. संबंधीत हॉटेलवर पर्यावरण कायद्याचा भंग केल्या्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

MP: राज्यात वाईन शाॅप आणि बार बंद करण्याचा निर्णय

भोपाळ – विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेले राज्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या राज्याच्या नव्या मद्यविषयक धोरणाला मंजुरी देण्यात आली. नव्या धोरणानुसार आता मद्यविक्रीच्या दुकानाच्या परिसरात बसून दारू पिण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा सर्व जागा आणि शॉप बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही काळापासून … Read more

मेक्सिकोत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

न्यूयॉर्क : मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल मेक्सिकोतील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला असून, यात ९ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. … Read more

माझी मुलगी 18 वर्षांची, ती कोणताही बार चालवत नाही; स्मृती इराणींनी फेटाळला काॅंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बार असल्याचा आरोप आणि त्यावर कॉंग्रेसने केलेल्या टीकेला इराणी यांनी उत्तर दिले आहे. आपली मुलगी 18 वर्षांची असून कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आहे, असे नमूद करत ती कोणताही बार चालवत नसल्याचा दावा त्यांनी केला. इराणी यांची मुलगी गोव्यात अवैधपणे एक … Read more

“या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा…”म्हणत क्रांती रेडकरचा मलिकांवर पुन्हा एकदा हल्लाबोल

मुंबई : मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोपांची मालिका काही केल्या संपत नाही. त्यातच आता समीर वानखेडे  यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी क्रांतीने ट्वीट करत दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे … Read more

Unlock : दिल्लीतील बार अन् बागा उद्यापासून खुल्या

pune unlock

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या बागा, सार्वजनिक उद्याने आणि बार सोमवारपासून खुले केले जाणार आहेत. दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटीने शनिवारी या विषयीचा आदेश जारी केला आहे. दिल्लीतील सर्व बार दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवले जाणार आहेत. बार मालकांना कोविडविषयक निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले … Read more

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”; अतुल भातखळकरांनी साधला शरद पवारांवर निशाणा

मुंबई : राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार खिठप्प झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यावरून … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध; बार, जीम, हॉटेल्स, सार्वजनिक उद्याने बंद

नांदेड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच काही जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा … Read more

“…बार, पब, नाईट लाईफ–नो लॉकडाउन” !; भाजपच्या ‘या’ नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन व पुण्यात रात्री संचारबंदीची देखील घोषणा केली गेली आहे. शिवाय, मुंबईतील महापौरांनी देखील लॉकडाउनचा इशारा दिलेला आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली … Read more