PUNE: अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलनाची पर्वणी; बार्टीतर्फे आयोजन

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने बुधवारी (तीन जानेवारी) पहिल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या या संमेलन स्थळाचे … Read more

PUNE: गोंधळ झाल्याने फेलोशिपची परीक्षा रद्द; आता कधी घेतली जाणार परीक्षा?

पुणे – बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात … Read more

‘बार्टी’मार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ – मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक 200 विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या 100 ने वाढवून 300 करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. दरवर्षी बार्टी मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची … Read more

‘बार्टी’ मार्फत मोफत ऑनलाइन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई  – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन दि.25 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी ऍप अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले … Read more

‘यूपीएससी’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार 50 हजार रुपये

पिंपरी – केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने एक रकमी रोख 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याकरिता या उमेदवारांनी बार्टीचे निकष पूर्ण करणे आवश्‍यक आहे.  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता दर वर्षी … Read more

बार्टीमार्फत 14 उमेदवार ‘यूपीएससी’ परीक्षेत यशस्वी

पुणे : समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते. या परीक्षेमध्ये 14 उमेदवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अविनाश शिंदे, नवनाथ माने, अशीत कांबळे, करून गरड, सौरभ व्हटकर, अभिजित सरकाते, प्रज्ञा खंदारे, निखिल दुबे, शशांक माने, … Read more

408 विद्यार्थ्यांना बार्टीकडून शिष्यवृत्ती

  मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत पीएचडी किंवा एमफिलचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (2018) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या सर्व 408 विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. या फेलोशिपसाठी अर्ज दाखल केलेल्या … Read more

बार्टीची स्पर्धा चाळणी परीक्षा पुढे ढकलली

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने स्पर्धा परीक्षांकरिता आयोजित चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाबाबतची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या परीक्षेची तारीख कळविण्यात येणार आहे. बार्टीच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता एलआयसी, रेल्वे, बॅंक या आस्थापनांमधील लिपिक वर्गातील भरतीच्या मार्गदर्शनाकरिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) दिले … Read more

ऊस मजुरांना बार्टीकडून मिळणार कामगारांचे दाखले

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची सूचना : बार्टीत आढावा बैठक पुणे – ऊस तोड कामगारांची लोकसंख्या निश्‍चित करण्याकरिता महाराष्ट्र व कर्नाटक येथील संबंधित सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा उभारण्याबाबत बार्टीमार्फत संशोधन व सर्वेक्षणावर आधारित नियोजनबद्ध व्यवस्था राबविणे. बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगारांना मागील पाच वर्षांच्या ऊस तोडीच्या कामाच्या आधारे ऊस तोड … Read more

…अन्यथा विद्यार्थ्यांकडून वसूल करणार रक्‍कम

बार्टीचा निर्णय : प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना पुणे – बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)मध्ये एम.फिल. व पीएच.डी. करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्तीशिवाय अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ अथवा अर्थार्जन करण्यासाठी अन्यत्र नोकरी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीची रक्‍कम तत्काळ रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शिष्यवृत्तीची रक्‍कमदेखील वसुल केली जाणार आहे. बार्टीचे निबंधक … Read more