Pune : पालिकेत समाविष्ट 23 गावांच्या पाणीप्रश्‍नी उच्च न्यायालयात याचिका

बावधन –महापालिकेत नव्याने समाविष्ट 23 गावांना पाणीपुरवठा करणे ही पुणे महानगरपालिका/ पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची जबाबदारी आहे. मात्र, ते जबादारी झटकत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये या गावांत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या गावांतील पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर दि. 4 मे रोजी सुनावणी होणार आहे, अशी … Read more

#Video | शासकीय नियम धाब्यावर, बावधनमध्ये काढली बगाड यात्रा

कवठे(प्रतिनिधी) – बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा पारंपारिक पध्दतीने आज साजरी करण्यात आली. जिल्हा व तालुका प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवीत बावधनकरांनी शेकडो वर्षे जुनी परंपरा जपली.  जुने बगाड गावातच ठेवून नवीन बगाड तयार करीत बावधनकरांनी प्रशासनाला अंधारात ठेवत पहाटेच्या अंधारातच बगाड पारंपारिक पध्दतीने बैलांच्या सहाय्यानेच सकाळी 9.30 च्या सुमारास गावात आणले. यावेळी पोलीस प्रशासनाने … Read more

बावधनमध्ये खाेदकाम अपूर्णच, रस्ते दुरुस्तीचे ‘वावडे’

कोथरूड  – केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याबाजूला कंपन्यांकडून खोदकाम केले जाते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण करून आणि खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात या कंपन्यांना “वावडे’च असल्याचे दिसून येते. मग ते शहरातील रस्ते असो, किंवा महामार्गालगतचे सेवा रस्ते. बावधन येथील सेवा रस्त्यावर खोदकाम करून पंधरा दिवस झाले, तरी त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज … Read more

पुणे : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधनजवळ अपघात

पुणे(प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधन जवळ अपघात झाला आहे. ॲम्ब्युलन्समधील रुग्ण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  ही ॲम्ब्युलन्स कोरोना रुग्णांना घेऊन बालेवाडी भागातील निकमार या क्वारंटाइन सेंटरकडे निघाली असताना रस्त्यात हा अपघात झाला आहे.