पुणे जिल्हा | सावधान, मिठाई घेताय जरा जपून

रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला असणार्‍या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फूड, जंक फूडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकले जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रांजणगाव येथील एका स्वीट होममधून मुलांना खाण्यासाठी नेलेल्या मिठाईत मेलेली अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. शिरुर तालुक्यात सध्या … Read more

पुणे | कॅल्शियम कार्बाइड वापराल, तर खबरदार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विशेषत: आंब्याच्या हंगामात आणि अन्य फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापर टाळावा. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यावसायिक तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रचालकांना दिला आहे. कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक … Read more

पिंपरी | आंबे खाताय, सावधान

नाणे मावळ (वार्ताहर) – मावळ तालुक्यात सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते आहे. पण याच पिवळ्या धम्मक आंब्यांमध्ये काही घातक रसायनांचा सर्रास वापर होत असल्याचे आंब्याच्या रंगावरून दिसून येते. हे रसायन शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे मावळातील शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा चौकात-चौकात, लग्न सोहळ्यामध्ये … Read more

काळजी घ्या ! करोना वाढतोय.. 24 तासात 600 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू

CORONA UPDATE : काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणूचे एकूण ६३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे कोविड-19 विषाणूची लागण झाल्यामुळे 3 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३९४ … Read more

काळजी घ्या ! कोरोना वाढतोय.. केरळ पाठोपाठ ‘या’ राज्यामध्ये वाढले रुग्ण..

नवी दिल्ली – देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून केरळ आणि कर्नाटकमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. गेल्या २४ तासात एकूण ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६६ रुग्ण केरळमधील आहेत, तर शेजारील कर्नाटकमध्ये ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या … Read more

पुणे जिल्हा : सावधान, पोलिसांचा दावाही फोल!

उरुळी कांचन  – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनो सावधान. आपल्या घरातील किंमती ऐवजाची व आपापल्या महागड्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची काळजी घ्या. कारण लोणी काळभोर, उरुळी कांचन, कोरेगाव मूळसह परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या व वाहनचोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून घरफोडी, चारचाकी व दुचाकी … Read more

काळजी घ्या ! एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येणार.. आयएमडीने व्यक्त केला अंदाज

पुणे – एप्रिल ते जूनदरम्यान देशात उष्णतेची लाट येणार असून, त्याचा परिणाम दीर्घकाळ असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्‍त केला आहे. या महिन्याच्या अखेरीस आणि संपूर्ण उन्हाळ्यात शहराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्‍यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातील बहुतांश भागात … Read more

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

नवी दिल्ली – देशात बऱ्याच अवधीनंतर नव्याने आढळणाऱ्या कोविड रुग्णांची एका दिवसातील संख्या एक हजाराच्यावर गेली आहे. गेले अनेक दिवस ही संख्या खूपच रोडावली होती. पण पुन्हा ही संख्या 24 तासांच्या अवधीत एक हजाराच्यावर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासांत 1,134 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यामुळे … Read more

काळजी घ्या ! लहान मुलांचे आरोग्य सांभाळा.. राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार

मुंबई -राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील दोन दिवसात कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही … Read more