पुणे जिल्हा | 4800 हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी

बेल्हे, (वार्ताहर) – बेल्हे मंडल कार्यालयाअंतर्गत एकूण 35 गावे असून यामध्ये अंदाजे 4800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. त्यासाठी 2640 क्विंटल बियाणे बियाणांची गरज आहे. सध्या शेतक-यांकडे 3200 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती मंडल कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केले आहे. खरीप हंगाम पूर्व नियोजन मोहीम वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील शिवाजी डोके यांच्या … Read more

पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात खरीप पूर्व शेतीच्या कामांना सुरुवात

  वेल्हे, (प्रतिनिधी) – इंद्रायणी तांदुळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या राजगड तालुक्यामध्ये. खरीप पूर्व हंगामी शेती माशागत कामांना गती आली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपारिक शेती मशागतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत असल्याचे संपूर्ण राजगड तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभर दिवसा उन तर सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे … Read more

पुणे जिल्हा | संदीप हरियाणा ठरला आळे केसरी

बेल्हे,(वार्ताहर) – आळे केसरी 2024 च्या मानाच्या गदेचा मानकरी संदीप हरियाणा ठरला. त्याने अंतिम कुस्ती स्पर्धेत आकाश चव्हाणचा पराभव करीत 25 हजार रुपये व मानाची चांदीची गदा पटकावली. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या श्रीक्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथील रेडा समाधी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची यात्रा अतिशय उत्साहात पार पडली … Read more

पुणे जिल्हा | कडकडीत ऊन अन् लग्न सोहळ्यांचा ताप

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात उन्हाचा पारा 40 च्या वर गेला असून यंदाच्या वर्षी कडाक्याच्या उन्हाळ्याने वर्‍हाडी मंडळी हैराण झाले आहे. त्यात लग्नसराईने तर व-हाडी मंडळींना अगदी नको-नकोसे केले आहे. या संधीचा फायदा मात्र लोकसभेचे उमेदवार व नेतेमंडळी पुढारी मंडळी घेत आहेत. लग्न समारंभात तासभर पुढार्‍यांची भाषणे ऐकून घ्यावी लागत आहेत. थंड पेय, उसाचा रस, … Read more

पुणे जिल्हा | जुन्नरच्या पाच गावांची तहान भावण्याची सोय

बेल्हे (वार्ताहर) – अणे पठारावरील दुष्काळग्रस्त पाच गावांना मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत या गावांना असाच मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अणे, नळवणे, व्हरुंडी, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या सर्व गावांना प्रत्येक एका गावाला दिवसातून एक पाण्याची खेप दिली जाणार आहे. राजुरी उंचखडक (ता. जुन्नर) येथील पंकजभाऊ सोपान कणसे यूवा … Read more

पुणे जिल्हा | देशी टर्किश बाजरी करणार लखपती

बेल्हे, {रामदास सांगळे} – आळे लवणवाडी येथील एका शेतकर्‍याने बाजरी पीक चांगल्या प्रकारे पिकवले असून यामधून त्यांना मिळणार एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी जबाजी भाऊ कुर्‍हाडे यांनी या वर्षी उन्हाळी बाजरी पीक घेण्याचे ठरवले त्यानुसार यासाठी एक एकर क्षेत्राची निवड केल्यानंतर त्यामध्ये चार ट्रॉली शेणखत पांगवले. त्यानंतर … Read more

पुणे जिल्हा | आणे पठारावर तीव्र पाणीटंचाई

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठार भागावर असलेले आणे, नळावणे, आनंदवाडी, पेमदरा येथील जलसाठे कोरडे पडले आहेत. येथील गावांना दोन दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. काही भागात विहिरी, कूपनलिका, तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. नदीवरील बंधारे तर केव्हाच उघडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे शेतीपिके … Read more

पुणे जिल्हा | कुकडीच्या पाणी नियोजनातून वडज धरण वगळा

बेल्हे, (वार्ताहर) – वडज (ता. जुन्नर) धरणातून मीना नदीला जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीपर्यंत सीमित करावे व कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याकडे निवेदन केली आहे, अशी माहिती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. यावेळी जुन्नर … Read more

पुणे जिल्हा | बेल्हे बाजारतळात शुकशुकाट

बेल्हे, (वार्ताहर) – येथे दर सोमवारी भरणार्‍या बाजार समितीच्या उप बाजार आवारात संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे समजले की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियमन 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 नुसार सुधारणा प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार … Read more

पुणे जिल्हा | अण्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

बेल्हे, (वार्ताहर) – अणे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष भारती बोरा तसेच मंगरूळ गावच्या सरपंच तारा लामखडे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, पारगाव गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार या उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक … Read more