पुणे जिल्हा : बुथमधील लाभार्थी, मतदारांपर्यंत पोहोचा

शिवप्रकाश यांचे आवाहन : बारामतीत भाजपाची बैठक बारामती – बारामती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजपा पदाधिकारी यांची तातडीची बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये बूथ आढावा, बूथ समिती कार्यान्वित करून फक्त बुथच नाही तर बुथमधील लाभार्थी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले. भारतामधील लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपाचे … Read more

योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने पंतप्रधान मोदी संतापले

नवी दिल्ली  – गरीब आणि असहाय लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक दिवसांपासून लक्ष देत आहेत. या संदर्भात, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, माडिगासारख्या अनुसूचित जाती समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उचलल्या जाणार्‍या प्रशासकीय पावलांचे परीक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. लाभार्थ्यांपर्यंत योजनेचे लाभ मिळत नसल्याबद्दल पंतप्रधान मोदी संतप्त झाल्याचे समजते. ही समिती … Read more

अहमदनगर – लाभधारक “आनंदाचा शिधा’च्या प्रतीक्षेत!

शेवगाव -दीपावलीचा सण तोंडावर येऊन ठेपला असूनही येथील लाभधारक अद्याप आनंदाचा शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्‍यातील प्राधान्य कुटुंब कार्ड लाभधारक 32 हजार 766 व अंत्योदयचे 9 हजार 756 अशा एकूण 39 हजार 885 लाभधारक कार्डधारकांसाठी आजअखेर केवळ 37 हजार आनंदाचा शिधा संच शेवगाव पुरवठा विभागात प्राप्त झाला आहे. त्यातही लाभधारकाला शंभर रुपयात वाटप करावयाच्या साखर, पामतेल, … Read more

216 लाभार्थ्यांकडून 32 लाख 40 हजारांची वसुली

सातारा – अमृत महाआवास अभियानांतर्गत गरजूंना घरकुले देण्याचे अभियान शासनातर्फे सुरु आहे. घरकुल मंजूर होऊन अनुदान प्राप्त होऊनसुध्दा वर्षभरानंतरही 372 लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही लाभार्थींनी घरकुलाची कामे करण्यास अनुकुलता दर्शवली. मात्र, 216 लाभार्थ्यांनी घरकुलांची उभारणी केली नाही. अशा 216 लाभार्थींकडून जमा झालेला हप्ता 32 लाख 40 हजार … Read more

54 लाभार्थ्यांना पावणेतेवीस लाखांचे अनुदान वाटप

सातारा – अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्‍वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत 2022- 23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 54 लाभार्थींना 22 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली. राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत … Read more

पुण्यात शहरी गरीब योजनेतील लाभार्थ्यींना स्मार्ट कार्ड

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना शहरातील खासगी रुग्णालयात चांगल्या दर्जाचे उपचार घेता यावेत, यासाठी महापालिकेकडून एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजना राबविण्यात येते. या योजनेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, आता सभासदांना कागदी कार्ड ऐवजी स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. हे स्मार्ट … Read more

विविध योजनांच्या लाभार्थींना जिल्हा बॅंक देणार कर्ज

संतोष पवार सातारा  – केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी लाभार्थींना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने घेतला आहे. या निर्णयामुळे एकही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नसून या कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार कृषी व संलग्न योजना, पशुसंवर्धन योजना वेळोवेळी … Read more

Covid-19 | राज्यात काल दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस

मुंबई  : राज्यात काल (दि. 9 आॅक्टोबर, शनिवार) दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-19 लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज दिली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात … Read more

पीएमएवाय योजनतील लाभार्थ्यांना आयुर्विमा सक्तीचा करा

नवी दिल्ली  – प्रधानमंत्री आवास योंजनेतील लाभार्थ्यांना लाईफ ईन्श्‍युरन्स घेणे सक्तीचे केले पाहिजे अशी मागणी भारतीय चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजने केली आहे. या योजनेतील लाभार्थ्याची मृत्यू झाल्यास त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना घर मिळण्यास अडथळा येऊ नये अशी या मागची भूमिका आहे असे या संस्थेने केली आहे. भारत सरकारने सन 2022 मध्ये देशातील प्रत्येकाला घर देण्यासाठी … Read more

रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय … Read more