satara | यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या

सातारा (प्रतिनिधी)- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेसने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा केवळ वापर केला. त्यांचे विचार अंगिकारले नाहीत. पुढे येऊ पाहणाऱ्या माणसांना गायब करण्याचे काम … Read more

Master Tara Singh । ‘मास्टर तारा सिंह हे भारतरत्नचे खरे पात्र’

Master Tara Singh ।  शिरोमणी अकाली दल (एसएडी)चे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र लिहत मागणी केली आहे. या पत्राद्वारे  पंजाबचे दिग्गज नेते मास्टर तारा सिंग यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करण्यात आली. सुखबीर सिंग बादल यांनी  १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.  या  पत्रात, ‘आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि सध्याच्या … Read more

कटाक्ष : भारतरत्नाच्या देशा!

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले गुरू शहाण्णव वर्षांचे लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देऊन ‘गुरूदक्षिणा’ दिली. संघ परिवारातील तिसरे आणि भारतरत्नच्या यादीतील पन्नासावे. लालकृष्ण आडवाणी हे कराचीत जन्माला आलेले सिंधी! फाळणीनंतर भारतात आलेले. त्यांच्या या पार्श्‍वभूमीला महत्त्व देऊन तत्कालीन संघ नेतृत्वाने त्यांना जनसंघाचे अध्यक्षपद दिलं आणि त्यांच्याच हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांचे कट्टर विरोधक बलराज मधोक यांची … Read more

भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंकडून लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन; म्हणाले – ‘अखंड भारताचे..’

मुंबई – अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. “प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते अडवाणी जी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी … Read more

Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ जाहीर

Karpoori Thakur : भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे जननायक म्हटले जाते. त्यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर येथे झाला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाने ही घोषणा केली. कर्पुरी ठाकूर हे स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि राजकारणी म्हणून ओळखले जात होते. बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री … Read more

सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा – दीपक मानकर

पुणे – देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे मानकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, या मोहिमेचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

“स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या”: संजय राऊत यांची मागणी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच ही मागणी शिवसेना आज नाही तर मागील १५ वर्षांपासून करत असून त्यांना आजपर्यंत भारतरत्न का देण्यात आला नाही असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना संजय राऊत … Read more

मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे – अरविंद केजरीवाल

अहमदाबाद – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये जी सुधारणा केली आहे, ते अन्य राजकीय पक्षांना गेल्या 70 वर्षांत करता आले नाही. अशा व्यक्तीला भारतरत्न दिले जाण्याची गरज असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले की आज संपूर्ण देशाचे शिक्षण क्षेत्र सिसोदिया यांच्याकडे सोपवले जाण्याची गरज … Read more

अतुल गोगावले उलगडणार भारतरत्नांची यशोगाथा

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय – अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने मराठीसह बॉलीवूड मध्येही आपली अमिट छाप निर्माण केली आहे. विविध कॉन्सर्ट मध्ये आपल्या गाण्याने, तालवादनाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीतकाराच्या बहारदार अशा भूमिकेतून रसिकांना … Read more