PUNE: माळी महासंघातर्फे फुले दाम्पत्याला महारॅलीव्दारे अभिवादन

पुणे – फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात १७६ वर्षांपूर्वी मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याची मुहूर्तमेढ एक जानेवारी १८४८ रोजी रोवली. या त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माळी महासंघातर्फे दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी फुले … Read more

PUNE : भिडेवाडा स्मारक रखडण्याची चिन्हे

पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथे आता राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. मागील आठवड्यात याबाबतचा निकाल उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने दिला आहे. यासाठी भूसंपादन तसेच स्मारकाचे काम गतीने करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण, या कामाला “ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने … Read more

पंतप्रधान पुण्यात आल्यावर ‘भिडेवाडा’ पडदा टाकून का झाकला?

पुणे – एका बाजूला लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेला पुरस्कार स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, त्याच वेळी शहरात मात्र, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेले असताना; मंदीराच्या समोरच असलेला भिडेवाडा मात्र पडदा लावून झाकण्यात आला होता. याच भिडे वाडयात … Read more

Pune : भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी

पुणे  : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या महाधिवक्त्यांना केली. पालकमंत्री पाटील यांनी पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची … Read more

पुण्यातील भिडेवाडा वास्तू संदर्भात समिती स्थापन करा – छगन भुजबळ

मुंबई – पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्‍यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, असा आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

अहमदनगर: भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करा

नगर (प्रतिनिधी) – महत्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची वस्तू भिडेवाडा या ठिकाणीची जागा शासनाने तात्काळ भुसंपादीत करावी. ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करुन विकसित करावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महानगर अध्यक्ष … Read more

भाजप सरकारमुळे भिडे वाड्याची दुरवस्था- रोहित पवार 

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा; रोहित पवारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट  मुंबई: नवनिर्वाची आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यांची भेट घेतली. दरम्यान पुण्यातील भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी त्यांनी चर्चा केली. रोहित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई … Read more

#Video: सावित्रीच्या लेकींनी द्यावा शाळेसाठी लढा!

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डिजिटल प्रभातने स्त्री शिक्षणाची ज्योत जेथून पेटवली गेली त्या भिडेवाड्याची पाहणी केली. त्यावेळी दिसली ती सर्व पातळीवरीची अनास्था!

भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक दर्जाच्या मागणीसाठी मशाल मोर्चा

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरु केली होती. यामुळे भिडे वाड्याला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आहे. म्हणूनच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी फुलेवाडा ते भिडेवाडा मशाल मोर्चा काढण्यात आला.