पुणे जिल्हा : भिगवणमध्ये नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंचे स्वागत

भिगवण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूरला जात असताना त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, भिगवण येथे आल्यानंतर … Read more

भिगवणच्या तनुजाची जिद्द पाहून श्रीराज भरणे भारावले; व्हीलचेअर दिली भेट

इंदापूर – नियतीने जन्मता: अपंग बनवलेली १३ वर्षीय तनुजा गणेश शेळके ही सध्या आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरली आहे. त्याचे कारणही खास आहे, कारण नशिबी आलेल्या अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता ही आबला बालिका आपल्या वडिलांचा व्यवसाय मोठया जिद्दीने संभाळून कुटुंबाला हातभार लावत आहे. ही कहाणी आहे भिगवण (ता.इंदापुर) येथील तनुजा गणेश शेळके या … Read more

भिगवण येथे रेल रोको आंदोलन

भिगवण (पुणे जिल्हा) – भिगवण येथे हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, कन्याकुमारी व बंगळूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी दि.२७ रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळापासून या रेल्वे गाड्यांचा थांबा भिगवण स्टेशन येथून बंद करण्यात आला होता परंतु तदनंतर सदरचा थांबा पूर्ववत होण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन हा थांबा पूर्ववत … Read more

पुणे जिल्हा | बिल्ट कंपनीतील कामगारप्रश्नी भिगवण येथे रस्ता रोको

भिगवण,  (वार्ताहर) –बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत कामगार आमरण उपोषणाला बसलेले असून पंधरा दिवस होऊनही निर्णय होत नाही. त्यामुळे उपोषण करणारे कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे. असे असतानाही 15 दिवस होऊनही बिल्ट कंपनी, माथाडी बोर्ड यांनी दखल घेतलेली नाही त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार यांचेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. … Read more

कर्नाटकच्या मातेने पाहिली भिगवणची माणुसकी; तान्हुल्याने अनुभवला काळरात्र होता होता उष:काल

भिगवण – येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रसंग… पुण्याहून सोलापूरकडे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसूती कळा येऊ लागल्यावर प्रवासात लगतचे गाव व समोर प्रसुतीगृह दिसल्याने बसमधून उतरविण्यात आले, हॉस्पिटलचा दरवाजा ठोठावताच डॉक्‍टर नसल्याचे सांगितले गेले. इतर कोणी मदतीस येत नसल्याने बिकट स्थितीत रुग्णवाहिका चालक तिथे येऊन पाहतो, स्त्रीरोगतज्ज्ञांना विनंती करतो आणि त्यासुद्धा माणुसकी जागी … Read more

Bhigwan : धारदार शस्त्राने शरिराचे तुकडे करून युवकाचा निर्घृण खून

भिगवण(प्रतिनिधी) – तक्रारवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत नदीपात्रालगत तीस वर्षीय युवकाचा हात-पाय, शिरविरहित पाच तुकड्यांमध्ये असलेला मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने अतिशय निर्घृण खून झाल्याची शक्‍यता यातून व्यक्त होत आहे. मुंडके नसलेल्या शरीराचे पाच तुकडे करून प्लॅस्टिक पिशवीत भरलेले आहेत. विवस्त्र अवस्थेतील या अनोळखी युवकाचे अवयव भिगवण पोलिसांना तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून … Read more

भिगवण: गेम फिश मदनवाडी तलावात वाढणार

टाटा पॉवर व रोटरी क्‍लब करणार संवर्धन भिगवण – 80च्या दशकात अवघ्या जगातून नामशेष झालेला व जगभरात “गेम फिश’ म्हणून ज्या माशाकडे पाहिले जाते, त्या महाशीर अर्थात देवामाशाचे संवर्धन करण्याचा विडा टाटा पॉवर आणि रोटरी क्‍लबने उचलला असून, प्रायोगिक तत्वावर या माशाचे मत्स्यबीज मदनवाडी तलावात सोडण्यात आले आहे. या महाशीर माशाला भारतासह थायलंड, मलेशिया आदी … Read more

भिगवणच्या माशांना चव आणि ओळख देणारे ‘जय मल्हार मच्छी खानावळ’

45 वर्षांपूर्वी गुऱ्हाळात गुळव्या म्हणून काम करणाऱ्या मारुती कांबळे यांनी भिगवणमध्ये हॉटेल व्यवसायाचा नवा मार्ग चोखाळला. कोणताही अनुभव नसताना सहकाऱ्यांच्या मदतीने मारुती कांबळे यांनी छोटंसं नाष्टा सेंटर सुरू केले. त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने घरगुती खानावळ सुरू केली. दर्जेदार, चविष्ट मच्छी ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आता सुवर्णमहोत्सवी वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या “हॉटेल जय मल्हार’चा प्रवास तिसऱ्या पिढीपर्यंत स्थिरावला आहे. … Read more

राज्यातील बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश

-दोघांना कोठडी : शेकडो बेरोजगारांना लावला चूना -पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी शाखेने केला पर्दाफाश भिगवण(प्रतिनिधी) – सैन्यात भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या शाखेने पर्दाफाश केला आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे उजेडात आले नसले तरी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसली असल्याने यात कोणी बडा … Read more

भिगवणकरांना दिलासा ;  १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, ६ बाकी

भिगवण (वार्ताहर) – भिगवण स्टेशन येथील महिला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ जणांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुरेखा पोळ व आरोग्य अधिकारी डॉ. अमित उदावंत यानी दिली. इंदापूर तालुक्यातील सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना बारामती येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते .त्यांचे बारामती येथील सिल्वर ज्युबिली … Read more