भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: हनी बाबूंनी जामीन याचिका घेतली मागे, मुंबई हाय कोर्टात जाणार

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी हनी बाबू यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टातील आपला जामीन अर्ज मागे घेतला. ते आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांच्यावर माओवाद्यांशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती … Read more

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भिडे गुरुजींवर कारवाई झालीच पाहिजे – रामदास आठवले

सोलापूर – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र सबळ पुरावे न मिळाल्यामुळे दोषारोप पत्रातून त्यांचे नाव काढून टाकण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला नुकतीच देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला असून संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव दोषारोप पत्रातून … Read more

शरद पवार यांना समन्स बजावण्याची मागणी

पुणे – भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराबाबत अधिक माहिती असल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाकडे सादर करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा, अशी मागणी करणारा अर्ज एका व्यक्‍तीने भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे गुरुवारी केला. पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी … Read more

माओवादी प्रकरण : प्रकाश आंबेडकरांची चौकशी का केली नाही?

बचाव पक्षाचा सवाल  पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटना प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रात टोपन नावे मिळून आली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला. मात्र, काही पत्रात कॉमेड प्रकाश आंबडेकर असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांची साधी चौकशी का केली नाही, असा सवाल बचाव … Read more

वरवरा राव यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे – माओवादी संघटनांशी संबंधांच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकमधील तुंकुर जिल्ह्यात 2005मध्ये माओवाद्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना राव यांचा ताबा घेतला आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात राव यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च … Read more

पुणे – फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा

पुणे पोलिसांची रांची येथे कारवाई पुणे – पुणे पोलिसांनी झारखंड राज्यातील रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकून हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा इलेक्‍ट्रॉनिक डाटा व काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील कोरेगाव-भीमा याठिकाणी दोन … Read more

कोरेगाव-भीमा हिंसाचार : गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा

12 जून पर्यंत दिलासा कायम मुंबई – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याचा संशय असलेल्या गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला. न्या. रणजीत मारे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गडचिरोलीतील हल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवलखा यांनी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा रद्द करण्याची राज्य सरकारची विनंती फेटाळून लावली आणि याचिकेची सुनावणी 12 जून पर्यंत तहकूब … Read more