सातारा – जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

शिवथर – विकास कामांबरोबर जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याचबरोबर मतदारसंघातील गावात वाडी-वस्तीवर विकासाचे गंगा पोहोचवत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने‌ गावच विकास करणे माझी जबाबदारी असून विकास कामामुळे गावे प्रगती पथावर पोहचणार आहेत. त्यादृष्टीने पुढील वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले. म्हसवे (ता. सातारा) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत … Read more

लक्ष्मीनगर येथे लोकवर्गणीतून हनुमान मंदिर उभारणार

आळंदी – विश्रांतवड परिसरातील लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द) येथे लोकवर्गणीतून हनुमान मंदिर उभारण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 1) मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. लवकरच मंदिर उभारणीचे काम सुरू होणार आहे. मंदिर उभारणीसाठी येथील ज्ञानेश्वर पगडे यांनी स्वमालकीची एक गुंठा जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच पुण्यभूमी डेव्हलपर्सचे सुशांत थोरवे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. याप्रसंगी खेड … Read more

अग्रलेख : मंदिर उभारणीचा मंगल क्षण!

अयोध्येत आज प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर राममंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ होतो आहे. अनेकांसाठी हा आनंदाचाच सोहळा आहे. रामजन्मोत्सवाच्या आनंदासारखा हा मंगलमयी सोहळा आपल्याला “याची देही याची डोळा’ अनुभवायला मिळत असल्याच्या कृतार्थ भावना अनेकांनी व्यक्‍त केल्या आहेत. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्यानगरीत आज बुधवारी प्रत्यक्ष मंदिर उभारणी सुरू होईल. या दिवसासाठी डोंगराएवढ्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला आहे. या … Read more

रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी- जितेंद्र आव्हाड

मुंबई : नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी असेही ते म्हणाले आहेत. … Read more

भूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई

दिवसभरात 5 ते 6 भूमिपूजनाचे कार्यक्रम पुणे – आगामी विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनांचे नारळ फुटायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्य दिवसभरात किमान 4 ते 5 भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकत आहेत. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. जिल्हा परिषद म्हणजे “मिनी मंत्रालय’, त्यामुळे … Read more