पुणे जिल्हा : जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास आवश्यक

– वनपाल सोनल भालेराव यांचे प्रतिपादन लोणी धामणी – जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास व संवर्धन, संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच व जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केले. धामणी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे वनविभागाच्या वतीने … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून फुलपाखरांच्या ९८ प्रजातींची नोंद

पुणे – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (एसटीआर) जैवविविधतेची गुंतागुंतीची टेपेस्ट्री उलगडण्याच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तीन टप्प्यांत फुलपाखरू सर्वेक्षण सुरू केले आहे. यात दोन सर्वेक्षणांच्या आकडेवारीवरून ९८ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. सातारा (महाबळेश्वर, मेढा, सातारा आणि पाटण तहसील), सांगली (शिराळा तहसील), कोल्हापूर (शौवाडी), आणि रत्नागिरी (संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तहसील) … Read more

जैवविविधतेची हानी या समस्यांवर एकत्रित उपाय हवे

मुंबई : जैवविविधता आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्टपणे दिसत असून विकासाची गती कायम राखण्यासाठी तसेच लोककल्याण आणि समृद्धीला चालना देण्याच्या मार्गात महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण करत आहेत. म्हणूनच संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्परसंबंधित समस्यांवर जी 20 देशांनी एकत्रितपणे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. भारताचे जी 20 अध्यक्षपद … Read more

जैवविविधता हे हवामान बदलाला तोंड देणारं सुरक्षाकवच – सतीश आवटे

नांदेड (प्रतिनिधी) :- जैवतंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे, म्हणून जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करतांना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जैवविविधता हे हवामान बदलाला तोंड देणारं सुरक्षाकवच असल्याचे मत पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम संचालक सतीश आवटे यांनी मांडले. माध्यमशास्त्र संकुल आणि भूगर्भशास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युनिसेफ यांच्या सहयोगाने … Read more

पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात

महापालिकेकडून जैवविविधता धोरण आणि कृती योजनेचे काम पिंपरी – वाढत्या नागरीकरणात शहरातील पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. ही बाब लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने जैवविविधतेच्या संवर्धनासाठी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातंर्गत शहरातील जैवविविधता निर्देशांक काढणे, नागरिक जैवविविधता नोंदवही तयार करणे आणि स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती योजना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी … Read more

गोड्या जलस्रोतांची जैवविविधता अधोरेखित

सह्याद्रीच्या खोऱ्यातून माशांच्या नवीन प्रजातींचा शोध पुणे – विस्तृत समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात समुद्री जैवविविधतेचे अनेक हॉटस्पॉट आहेत. मात्र, याच परिसरातील गोड्या पाण्यातील जैवविविधताही तितकीच संपन्न असल्याचे पुरावे, अलीकडील काळात उपलब्ध होत आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यातून माशांच्या नवनवीन प्रजातींचा शोध लागत असून, पश्‍चिम घाटातील नद्यांची परिसंस्था ही गोड्या पाण्यातील माशांच्या विविधतेचे केंद्र असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. सागरी … Read more

कोरोनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम ; जागतिक पर्यावरण दिन

पुणे : आज ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. संयुक्त राष्ट्रांनी १९७४ सालापासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यावरणाचे महत्व पटवून देणारा हा दिवस दरवर्षी वृक्षारोपणासारखे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे पर्यावरणाशी निगडित असलेले विषय, घटक आणि समस्या यांच्याकडे … Read more

साताऱ्यात जैवविविधता नोंदीच्या कामाला मुहूर्त

सातारा  – प्रशासकीय इच्छाशकती दाखवत अखेर सातारा पालिकेने शहराच्या जैवविविधता अहवालाच्या कामाला गती दिली आहे. शहरातील पर्यावरणीय नोंदीबाबत सर्वेक्षण करण्याचे काम पुण्याच्या ऑरकॉन या प्रसिद्ध संस्थेला देण्यात आले असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सातारा शहरातील वृक्ष, त्यांच्या प्रजाती, मोजदाद, वर्गीकरण, प्राणी व पक्ष्यांचे वर्गीकरण, जलसंपत्ती सर्वेक्षण, मृदांचे प्रकार, नोंदी, पर्जन्य अहवाल, लोकजीवन, सामाजिक … Read more