पुणे जिल्हा | चिमणी पक्ष्यांचे संवर्धन गरजेचे

शिक्रापूर, (वार्ताहर)- सध्या वाढत्या जागती करणामुळे सर्वत्र वेगवेगळा बदल होत असताना पशु पक्ष्यांची संख्या देखील कमी होत असल्यामुळे भारतात 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे. चिमणी पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी चिमण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मनुष्यवस्तीत माणसांच्या घराच्या छतावर राहून पिलांना जन्म देणारा पक्षी म्हणजे चिमणी, अलीकडील काळात शेतीसह … Read more

समुद्र-खाडी परिसरात परदेशी पक्ष्यांचे आगमन

पुणे – दरवर्षीच्या हिवाळ्यात असंख्य प्रजातींचे समुद्री पक्ष्यांचे आशिया खंड विशेषत: भारतातील समुद्रकिनारी आणि खाडी परिसरात आगमन होत असते. यंदाही हे पाहुणे आले आहेत. पण, यंदा थंडीचे जेमतेम प्रमाण आणि बदलत्या भौगोलिक स्थितीने हे पाहुणे काहिसे उशिरानेच आले आहेत. महाराष्ट्राला सुमारे ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे या परदेशी समुद्री पक्ष्यांसाठी हा परिसर एक उत्तम … Read more

PUNE: प्राणीमात्रांमध्ये सर्वाधिक असुरक्षित आहेत पक्षी

पुणे – प्राणीमात्रांमध्ये सर्वाधिक असुरक्षित पक्षी असल्याचे ‘रेस्क्यू’ (आरईएसक्यु) ने दिलेल्या ताज्या अहवालातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी पुणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाच हजार ७३४ वन्य प्राण्यांना मदत करण्यात आली होती. त्यापैकी तीन हजार ४५७ (६१ टक्के) हे पक्षी होते. ‘रेस्क्यू’ (आरईएसक्यु) चॅरिटेबल ट्रस्टच्या ताज्या वार्षिक आहवालातून समोर आले आहे. यातील बहुतांश पक्ष्यांना … Read more

प्राणी-पक्ष्यांचा अधिवास ध्वनिप्रदूषणामुळे संकटात; ढोल- ताशा, डॉल्बी, स्पीकर्सच्या आवाजाचा अतिरेक

पुणे – ढोलताशे, डॉल्बी, स्पीकर्स यांचा मानवांवर जसा परिणाम होत आहे तसा प्राणी-पक्षांच्या अधिवासावर देखील परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे याचे वाढते प्रमाण नियंत्रित केले जावे अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव यासारख्या सणांसाठी ढोलताशा पथकांचा सराव जोरदार सुरू आहे. ढोलताशा पथकांना विरोध नाही, परंतु सणांच्या आधी चाळीस-पन्नास … Read more

विखळेच्या तरुणाचा अपघाती मृत्यू; मायणीतील पक्षी आश्रयस्थानासमोर ट्रक- कारची धडक

मायणी – मल्हारपेठ – पंढरपूर महामार्गावर मायणी येथील मठाजवळ अपघात होऊन चार दिवस उलटले नाहीत तोवर काल बुधवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मायणी पक्षी आश्रयस्थानाच्या नूतन बगिच्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या दहाचाकी ट्रक व मारुती ब्रिझा कार यांच्या भीषण अपघातात विखळे (ता. खटाव) येथील राजेंद्र जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या भागात अपघाताची मालिका सतत … Read more

श्रीकांत इंगळहळीकर यांनी ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून भातशेतीवर साकारला ‘कृष्ण गरूड’ किंवा ‘ब्लॅक ईगल’

पुणे  : निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात मात्र त्यांचेच चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा अनोखा प्रयोग हौशी वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळीकर हे सन २०१६ पासून करत आहेत. यंदा सातव्या वर्षी त्यांनी ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याच्या शैलीत ‘कृष्ण गरूड’ किंवा ‘ब्लॅक ईगल’ ही चित्रकृती सादर केली आहे. भरारी घेतलेल्या गरुडाचे‌ हे चित्र … Read more

“घरटी’ बनविण्यासाठी सुगरणीची लगबग सुरू, सप्टेंबरपर्यंत विणीचा हंगाम

हिंगोली  (शिवशंकर निरगुडे) – पावसाळ्याचे दिवस हे सुगरण पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. धरतीने हिरवा शालू परिधान करताच या पक्ष्याला विनीच्या हंगामाचे वेध लागतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या विहिरीच्या काठावर असलेल्या झाडा झुडपावर सुगरण पक्ष्यांमध्ये घरटे बांधायची लगबग सुरू झाली आहे. सुगरण पक्ष्यांचा विनीचा हंगाम सुरू झाल्याने विहारी काठीच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. चिमणीचे … Read more

तरूणांनी केली पक्ष्यांना `दाणा-पाणी`ची सोय; टाकाऊ डब्यांपासून बनवले “बर्ड फीडर”

वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक कामठवाडी येथील तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’ बनवला आहे.  आता उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, दिवसाचे कमाल तापमान वाढू लागले आहे. येत्या काळात प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे, ओढे- नाले, बंधारे जवळपास आटलेच आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अनेक ठिकाणाहून वणवण करावी लागते. नेमक्या अशाच वेळी वाल्हे (कामाठवडी) येथील ‘वृक्ष … Read more

अग्निशामक दलाने दिले 299 प्राणी-पक्ष्यांना जीवनदान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने गेल्या सात वर्षांत संकटात सापडलेल्या तब्बल 299 प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. तसेच पंतगाच्या मांज्यामुळे अडकलेल्या शेकडो पक्षांचीही सुटका केली आहे. आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले, तरी मालमत्ता वाचविणे आणि जीवितहानी होणार नाही यासाठी अग्निशामक दलाचे जवान कार्यरत असतात. केवळ माणसांचेच नव्हे, तर शेकडो प्राणी-पक्ष्यांचे जीव वाचवून कर्तव्य … Read more

पहा व्हिडीओ – देशातील पहिली कबूतरशाळा ; 7 मजली टॉवरसह…

नागौर – येथील देशातील पहिल्या कबूतरशाळेत पक्ष्यांसाठी 7 मजली बंगला तयार करण्यात आला आहे. यात विविध मजले आणि फ्लॅटच्या हिशेबाने एकाचवेळी सुमारे 3 हजार पक्ष्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. तर टॉवरखाली उभारण्यात आलेल्या स्टँडवर 24 तास पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था असणार आहे. चंचलदेवी बालचंद लुणावत ट्रस्ट अजमेरकडून पीह गावात उभारण्यात आलेल्या या 65 फूट उंच 7 मजली … Read more