“माझ्यासह अभिषेकच्या जीवाला धोका, आम्हाला सुरक्षित वाटत नाही…’; ममतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप

Mamta Banerjee On BJP | Lok Sabha Election 2024 – भाजप मला आणि माझा पुतण्या अभिषेक याला लक्ष्य करत आहे. त्यामुळे मला आणि अभिषेकला सुरक्षित वाटत नाही. आमच्या जीवाला धोका आहे, असे वाटते, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी … Read more

“जगामध्ये मोदींना ठार मारण्याचे कट शिजतायेत” ; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

Madhukar Chavan ।

Madhukar Chavan । देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार जोरात प्रचाराला लागले आहेत. त्यासाठी ते प्रचारसभा घेताना दिसत आहेत. त्यातच प्रत्येक पक्षाचे मोठे नेते देखील या सभांना हजेरी लावून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. अनेक ठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदा सत्तांतर होतंय की केंद्रात पुन्हा मोदी … Read more

‘उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांची चिंता करू नये’- नितीन गडकरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीत येण्याविषयी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर अप्रत्यक्षपणे धुडकावून लावली. उद्धव यांनी भाजप नेत्यांची चिंता करू नये, असे त्यांनी म्हटले. भाजपने काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, गडकरींचे नाव नसल्याने भुवया उंचावल्या … Read more

West Bengal : भाजप नेत्याकडून IPS अधिकाऱ्याचा खलिस्तानी असा उल्लेख; काय आहे प्रकरण?

West Bengal : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा खलिस्तानी असा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांची माफी मागावी अशी मागणी पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बंगालमधील भाजप नेत्यांनी पोलिस अधिकारी आयपीएस जसप्रीत सिंग यांचा ज्याप्रकारे खलिस्तानी संबोधून अपमान केला आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. … Read more

बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…

नवी दिल्ली – रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादव याच्या संबंधात प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्‌विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो आहेत. खूप गरळ ओकणाऱ्या … Read more

‘भारत-इंडिया’ वादापासून दूर रहा..! नरेंद्र मोदींचे भाजपा नेत्यांना आवाहन

नवी दिल्ली – जवळपास दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘भारत-भारत’ या राजकीय वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना या विषयावर भाष्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. जी 20 आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत त्यांनी हे सांगितले, “या वादावर कसलीही टिप्पणी करू नका. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांशी या विषयावर चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ … Read more

भाजप नेत्यांनी देशासाठी ‘भारत’ शब्द वापरण्यास केली सुरुवात, आसामचे मुख्यमंत्री म्हणाले – ‘रिपब्लिक ऑफ भारत’

नवी दिल्ली – विरोधकांनी आपल्या सामायिक आघाडीला भारत असे नाव दिल्याने यावर राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेत्यांनी इंडियाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाच्या खासदारांनीही इंडियाऐवजी भारत असा औपचारिक वापर करण्यास सुरुवात केली आहे. भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी तर इंडिया हा शब्द ब्रिटिशांची शिवी असल्याचे म्हंटले आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा … Read more

नक्षलवाद्यांनी केली भाजपा नेत्याची हत्या; पत्रकं टाकून दिला इशारा ,

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एक धक्कादायक घटना घडवली आहे. येथे नक्षलवाद्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि माजी सरपंच काका अर्जुन यांची निर्घृण हत्या केली. नेत्याची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मृतदेह रस्त्याच्या मधोमध टाकून दिला. एवढेच नाही तर मृतदेहावर चेतावणीचे नक्षलवाद्यांनी पत्रकेही फेकली आहे.  नक्षलवाद्यांनी सोडलेल्या पत्रात लिहिले आहे की,’काका अर्जुन यांनी आम्ही दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि … Read more

“भारताविषयी खोटी माहिती…” भाजप नेत्यांचा आता न्यूयॉर्क टाइम्सवर हल्लाबोल

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवणे सुरू केले आहे. हे वृत्तपत्र भारताविषयी खोटी माहिती प्रसारीत करीत आहे, असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने भारताविषयी काहीही प्रकाशित करताना तटस्थतेचे सर्व ढोंग मागे टाकले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्‍मिरातील वृत्तपत्र स्वातंत्र्यावर … Read more

राजस्थान: भाजप नेत्यांसाठी “इकडे आड तिकडे विहीर’सारखी परिस्थिती

जयपूर – राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आपल्याच लोकांच्या संघर्षात वेढलेला दिसत आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा शनिवारी चुरू जिल्ह्यातील सालासर मंदिरात वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या युवा मोर्चातर्फे परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारच्या निषेधाचे आंदोलन करण्यात येत आहे. सर्व आमदारांना धरणे यशस्वी … Read more