गाव सोडून येणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे – ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. रविवारी पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी पाटील यांच्या टीकेला खास शैलीत प्रत्युत्तर दिले. पूजा चव्हाण … Read more

“त्या” आमदारांच्या घरवापसीवर रोहित पवारांचे मोठे विधान म्हणाले,…

मुंबई  –  लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी सत्तेसाठी  भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी मेगा भरती दिसून आली. यात अनेक नेत्यांनी वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश घेतला मात्र  राज्यात मविआ सरकार आल्यामुळे या आयाराम गया रामची चांगलीच फजिती झाली होती.  यांनबाबत   राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपूर येथे  एका खासगी कार्यक्रमात गौप्यस्फोट केला … Read more

शरद पवार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये : चंद्रकांत पाटील

कोथरूड – रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी व्हावी. ती कोणत्याही यंत्रणेमार्फत करा, त्याबाबत आमचे काही मत नाही. मात्र, रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून स्वत: राजीनामा द्यावा. तसे न झाल्यास पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. रेणू शर्मांबाबत स्वत: मुंडे … Read more

‘भारतीय जनता पक्ष इतका दांभिक कसा? आश्चर्य आहे’

मुंबई – उत्तरप्रदेशमधील आझमगढ येथे एका दलित सरपंचाची हत्येची घटना मागील काही दिवसांपूर्वीच घडली होती.  यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांना सीमेवरच ताब्यात घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने दिले . चंद्रकांत पाटीलजी भाजपा इतका … Read more

‘करोना जम्बो हॉस्पिटल चार दिवसांत सुरू करू’

प्रशासनाचे आश्‍वासन; खासदार बापट यांचे आंदोलन मागे पुणे – पुण्यात उभारण्यात येणारे तात्पुरते जम्बो कोविड हॉस्पिटल 19 ऑगस्टपर्यंत उभारू आणि 21 ऑगस्टला त्याचे उद्‌घाटन होईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते; परंतु आजपर्यंत त्या जागेवर साधा तंबूही उभारण्यात आलेला नाही. हे हॉस्पिटल मुदतीत सुरू होऊ न शकल्याने बुधवारी खासदार गिरीश बापट यांनी आंदोलन करण्याचा … Read more

मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेले – चंद्रकांत पाटील

दूध संघाचे संचालक नेवाळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती वडगाव मावळ – दूध दरवाढीसाठी भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मावळ तालुक्‍यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर शनिवारी (दि. 1) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे सहभागी … Read more

‘कारगिल आणि करोना योद्धे यांच्यात साम्य’

आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन कात्रज/आंबेगाव बुद्रुक – कारगिल युद्धात विजय मिळावा यासाठी शत्रूंशी प्राणपणाने आपले सैनिक लढले. या योद्ध्यांचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो. करोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी करोना योद्धेही प्राणपणाने लढत आहेत. हेच कारगिल आणि करोना योद्धा यांच्यातील साम्य आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी … Read more

चंद्रकांत पाटील यांच्या नावाने रुग्णालयाकडे 25 लाखांची खंडणी; एकास अटक

पैसे घ्यायला आला अन्‌ अडकला : चंद्रकांत पाटील यांच्या तोतया स्वीय सहायकास अटक पिंपरी – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयाकडे 25 लाखांची खंडणी मागितली. मात्र निगडी पोलिसांनी आरोपीला पैशाचे आमिष दाखवून बोलविले. पोलिसांनी विणलेल्या जाळ्यात एक आरोपी अलगद अडकला. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. पुण्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. सौरभ … Read more

राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठण करा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :  मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीच्या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठण केलेलं नाही. त्यामुळ या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठण करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलीय. चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने भाजप सरकारने 2017 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच पुनर्गठण … Read more

चंद्रकांत पाटील म्हणतात…संजय राऊत ग्रेट!

कोल्हापूर: संजय राऊत हे इतके ग्रेट आहेत की परमेश्वराला देखील प्रश्न विचारतील म्हणून त्यांना उत्तर कोण देणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. भारत-चीन ताणावर संजय राऊत यांनी काही विधाने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांनी प्रश्न विचारले … Read more