शिवसेना-भाजप युती कोणत्याही क्षणी सत्तेत येऊ शकते; आठवलेंचे भाकित

सातारा – महाविकास आघाडीत अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना- भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकते, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रामदास आठवले कुटुंबीयांसोबत महाबळेश्‍वर येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील आघाडी सरकारबाबत ते म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेबरोबर कॉग्रेस कधीच जाणार नाही, या … Read more

शिवसेना नगरसेवकांना निधी देण्यास नकार

पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणुका लढविण्यात आल्या. ही युती झाल्यामुळे महापालिकेतही भाजपकडून शिवसेनेला अंदाजपत्रकात वाढीव निधी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना युती तुटल्याने आता भाजपने शिवसेनेला फटकारण्यास सुरुवात केली असून निधी देण्यास नकार दिला आहे. बुधवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची … Read more

पंकजा मुंडे, खडसे पक्ष सोडणार? चंद्रकांत पाटील म्हणाले… 

मुंबई – पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह काही भाजप नेते पक्षावर नाराज असून लवकरच पक्ष सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व … Read more

सिंहासनासाठी पवारांनी केलेले ‘खंजिरी प्रयोग’ आजही ध्यानात

sharad pawar letter to sheila dixit shivraj chauhan

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाशिवाघाडीसंबंधातील वक्तव्याने सत्तास्थापनेबाबत राज्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशातच आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात भाजप-राष्ट्रवादीचे सत्तासमीकरण जुळल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तरुण भारतच्या अग्रलेखातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. सिंहासन पटकावण्यासाठी पवारांनी केलेले ‘खंजिरी … Read more

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात – शरद पवार 

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेचे भाजप-शिवसेनेला विचारा, अशी प्रतिक्रिया देत सर्वांनाचा बुचकळ्यात टाकले होते. परंतु, महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेवर शरद पवारांनीच शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयीच्या हालचालींचे केंद्र आता मुंबईहून दिल्लीला हलले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून … Read more

‘…तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील’

नागपूर – मुख्यमंत्रीपदावरून सुरु झालेला शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. सामना तर तरुण भारताच्या संपादकीयमधून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर युती तुटल्याचे खापर फोडत आहे. युतीतून बाहेर पडल्यानंतर एनडीएतून आम्हाला बाहेर काढणारे तुम्ही कोण, असा सवाल करत सेनेकडून भाजपला केला होता. तर हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या … Read more

डिसेंबरआधीच नवे सरकार स्थापन होईल – संजय राऊत 

मुंबई – राज्यात सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. डिसेंबर महिना उजाडण्याआधी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झालेले असेल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, असे त्यांनी सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले कि, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, भाजप सरकार स्थापन करण्यास अयशस्वी … Read more

शिवसेनेचे नेते ‘गजनी’, आम्ही सामना वाचत नाही – भाजप 

नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेचा वाद विकोपाला गेला असून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर विखारी टीका करण्यात आली. या टीकेला भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सामना वाचत नाही. जे त्यात लिहितात तेच वाचतात, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी म्हंटले कि, … Read more

स्वार्थाने विनाश होतो; भाजप-शिवसेनेला मोहन भागवतांचा सल्ला 

नवी दिल्ली – राज्याच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्षातील वाद चांगलाच पेटल्याने रविवारी शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढण्यात आले. यावर एनडीएतून आम्हाला बाहेर काढणारे तुम्ही कोण असा सवाल करत सेनेने भाजपला केला. या पार्श्वभूमीवर आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. मोहन भागवत म्हणाले कि, स्वार्थाने विनाश होतो … Read more

होय, मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरच लोकसभेत युती – भाजप ज्येष्ठ नेते 

मुंबई – मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये चांगलेच सत्तानाट्य रंगले होते. ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडलेली शिवसेना आणि या मागणीला भाजपने नकार दिल्याने दोन्ही मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. रविवारी अखेर शिवसेना एनडीएतून अधिकृतरीत्या बाहेर पडली. अशातच मुख्यमंत्रीपदाचा वाद लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरु झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले आहे. नाव न छापण्याच्या … Read more