पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

बारामती तालुक्यातील काऱ्हाटीत सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

जळोची : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला. काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास … Read more

नगर : शिक्षकांच्या अधिवेशनात मंत्र्यांची छबी असलेला फलक फाडला

नगर – मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून रविवारी नगर शहरात होत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी घुसून व्यासपीठावर लावण्यात आलेल्या मंत्र्यांची छबी असलेला फलक फाडला. दरम्यान कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून आयोजकांनी स्वत:हून हा बॅनर खाली उतरवून घेतला. नगर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर रोडवर एका मंगल कार्यालयात रविवारी प्राथमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे … Read more

पुणे रेल्वे स्टेशनवरही ‘लिफ्ट’ ; मध्य रेल्वे बोर्डाकडून मंजुरी ; लवकरच काम होणार सुरू

पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर चार लिफ्ट आणि रॅम्प उभारण्याच्या कामाला मध्य रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची फ्लॅटफॉर्मवरून पादचारी पुलावर जाताना आणि खाली उतरताना होणारी दमछाक कमी होणार आहे. त्यासाठी दहा कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा सुरू होईल. मध्य रेल्वे विभागातील मुंबई, नागपूर, भुसावळ पाठोपाठ पुणे रेल्वे स्थानक … Read more

पुणे जिल्हा : “गाव तेथे शिवसेना’ बोर्ड

आंबेगाव तालुका प्रभारी प्रमुखपदी संतोष डोके मंचर  – “गाव तेथे शिवसेना’ शाखेचा बोर्ड लावण्याचा निश्‍चिय करण्यात आला आहे. त्यातचबरोबर शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष डोके यांच्यावर प्रभारी आंबेगाव तालुकाप्रमुख पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. आंबेगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लांडेवाडी ता.आंबेगाव येथे शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, त्यावेळी वरील निर्णय घोषित … Read more

‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना…’; कल्याण डोंबिवली पालिकेसमोरील फ्लेक्सने उडाला गोंधळ

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अज्ञात  कार्यकर्त्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर एक मोठा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्समुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.य फ्लेक्समध्ये कार्यकर्त्याने बंडखोरी केलेल्या आमदारांवर टीकास्त्र उगारले आहे. पालिकेच्या बाहेर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर, ‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू’  असे लिहिण्यात … Read more

“पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास…”; अहमदनगरच्या ‘या’ पेट्रोल पंपाची सोशलवर जोरदार चर्चा

अहमदनगर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना रोज बसतो. याच इंधनदर वाढीच्या एका पाटीने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. ‘पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,’ अशी पाटी … Read more

पुणे : भवानी पेठ पोलीस लाईन मंडळाचा”ज्ञानाचा प्रसाद वाटप’ कार्यक्रम

पुणे- “अखिल भवानी पेठ पोलीस लाईन श्री गणेश तरुण मंडळाने एक अनोखा उपक्रम वापरला आहे. “ज्ञानाचा प्रसाद वाटप’ असा हा उपक्रम आहे. यामध्ये लहान मुलांना चित्रकला व थोर व्यक्तींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील मंडळाच्या वतीने गणपती मुर्तीची स्थापना करण्यात आली. मंडळाचे यंदा 69 वे वर्ष असुन मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक … Read more

पुणे : 10 हजार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, बोर्डवर कारवाई

पुणे – मोठमोठे होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्‍स यांच्यावरील गेल्या दीड वर्षांपासून थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 25 दिवसांत 10 हजारांपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्सवर महापालिकेच्या “परवाना आणि आकाशचिन्ह विभागा’ने कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 51 मोठ्या होर्डिंग्जवर कारवाईचा समावेश आहे. शहरात जुन्या बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर आणि … Read more

राज्य बोर्डाच्या परीक्षा होणारच : शिक्षणमंत्री

पुणे – केंद्र शासनाने सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा होणारच आहेत. याबाबत राज्य शासनाकडून परीक्षा घेण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तर बारावीची परीक्षा 23 … Read more