शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका ! बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

बीड – नांदेड जिल्हा सोडला तर मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबादसह औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तर बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात येत असून, त्यानुसार पंचनामे देखील करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यात … Read more

बोगस बियाणे प्रकरणी ‘एसआयटी’ची स्थापना ! तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता

वर्धा- गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाण्यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आता या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे. तपास करणाऱ्या स्पेशल टीममध्ये एकूण 15 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे हे या ‘एसआयटी’ टीमचे प्रमुख असणार आहेत. याशिवाय चार … Read more

महाराष्ट्रातील बोगस बियाणांचे गुजरात कनेक्‍शन ! वर्धा येथे दीड कोटींचे बियाणे जप्त.. आतापर्यंत 10 जणांना अटक

वर्धा- वर्धा येथे कपाशीची बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (ता. 14) धाड टाकली होती. या धाडीत कारखान्यातून तब्बल 1 कोटी 55 लाखांचे बोगस बियाणी जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या बियाण्यांचे गुजरात कनेक्‍शन समोर आले आहे. एक कोटींचे हे बियाणे गुजरातमधून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली … Read more

सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यात … Read more

बोगस बियाणे-खते यांबाबत मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका, म्हणाले”बळीराजाच्या जिवाशी…”

मुंबई :– बोगस बियाणे, बोगस खते जर कुणी देत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला तर त्यांना सोडणार नाही. पाऊस जर पुढे सरकला असेल तर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कृषी आणि सहकार विभागाकडून … Read more

बोगस बियाणांच्या विक्रीवर बंदी घालावी; जुन्नर तालुका शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनची मागणी

नारायणगाव – जुन्नर तालुक्‍यात बोगस बियाणांची विक्री होत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनने पंचायत समिती जुन्नरचे बियाणे निरीक्षक निलेश बुधवंत, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, आमदार अतुल बेनके यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजित वाजगे, राजू वामन, महेश घुले, मयूर घुले, हनुमंत पवार, सागर … Read more

बोगस बियाण्यांमुळे कोट्यवधींचा फटका

पुणे – करोना संकटकाळात शेतकरी त्रस्त असताना आता बोगस बियाण्यांमुळे त्यांच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. राज्यातील सर्वच भागांत बोगस बियाणे पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी विविध शेतकरी संघटना करत आहेत. मात्र, शासन आणि प्रशासकीय पातळीवर या कंपन्यांना पंखाखाली घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. खरीप हंगाम वाया … Read more

हिंगोली : बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना आदेश हिंगोली : जिल्ह्यात बोगस बियाण्यासंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिले आहेत. जिल्ह्यात अनेक गावातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात पालकमंत्री वर्षा … Read more