आत्महत्येच्या प्रवृत्तेचा गुन्हा खूनाच्या गुन्ह्यात बदलू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय

पुणे : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खुनाच्या गुन्हयात बदलू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी विहीरीमध्ये प्रेत तरंगत असताना आढळले. या घटनेनंतर मयतेच्या सावत्र आई यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४, ५०६, सह ३४ अन्वये पती, सासु व दीर … Read more

सार्वजनिक हितासाठी कार्य करणे आवश्यक ! मुंबई उच्च न्यायालयाने सेबीला फटकारले

मुंबई. – भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने अर्थात सेबीने (SEBI) सार्वजनिक हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. तसेच अशा पद्धतीमुळे गुंतवणूकदारांच्या सार्वजनिक संस्थेवर असलेल्या विश्वासाला तडा जाईल, असा शब्‍दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी सुनावले. तसेच ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सेबीला फटकारले. न्या. जी एस कुलकर्णी आणि न्‍या. जितेंद्र जैन यांच्या … Read more

‘निवृत्तीवेतन हा मूलभूत हक्क’ – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई  – निवृत्ती वेतन हा मूलभूत हक्क आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या पेमेंटपासून वंचित ठेवता येणार नाही, जे त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे, एका माणसाची देणी निवृत्तीनंतर दोन वर्षांहून अधिक काळ रोखल्याबद्दल हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने 21 नोव्हेंबर रोजी हा … Read more

Ahmednagar – फटाक्‍यांची आतषबाजी, शहरे गुदमरली; श्‍वास कोंडला

नगर  -मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत फटाकेबाजी सुरु होती. राज्यातील प्रमुख शहरात रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे, रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांची हवा अधीच प्रदूषित आणखी प्रदूषित झाली आहे. वास्तविक फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असे आव्हान अनेक सामाजिक आणि … Read more

बलात्कार पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई – दत्तक घेतल्यानंतर बलात्कार पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करणे योग्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे करणे मुलाच्या आणि त्याच्या भविष्याच्या हिताचे नाही. न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या एकल खंडपीठाने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करताना ही टिप्पणी केली. बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने मुलाची डीएनए … Read more

मराठा उमेदवारांना EWS कोट्यातून नियुक्ती देणे योग्य आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

मुंबई – नोकरभरतीतील एसईबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भवितव्य अंधारात सापडलेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नियुक्ती देणे योग्य आहे का? याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तत्कालीन युती सरकारने … Read more

PUNE : पोलिसांना झटका; दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची स्थानबध्दतेची कारवाई रद्द

पुणे – लोहगाव परिसरात गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या नितीन किसन सकट (वय 21,रा. खेसेपार्क, लोहगाव) याची मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हेगारी व विध्वंसक प्रतिबंधक कायद्याने (एमपीडीए) करण्यात आलेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिला. पोलिसांनी मोक्काच्या खुप कारवाया केल्या आहेत. त्या न्यायालयात … Read more

आरोपीला अमर्यादीत काळासाठी कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन – HC

पुणे – खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. आकाश सतिश चंडालिया असे त्याचे नाव आहे. त्याचा वतीने ऍड. सना खान … Read more

Bollywood Films : ‘सिंघम’सारख्या चित्रपटांतून धोकादायक संदेश पसरत आहे’; मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई – ‘सिंघम’ (Singham) सारख्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेची पर्वा न करता झटपट न्याय देणाऱ्या “हिरो पोलिस’ची (police) सिनेमॅटिक प्रतिमा अतिशय धोकादायक संदेश देते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी व्यक्त केले. भारतीय पोलिस (police) फाउंडेशनने वार्षिक दिन आणि पोलिस सुधारणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती पटेल यांनी … Read more

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर आता ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी

औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगर असे औरंगाबादचे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर करण्याचा रख्य सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली. मात्र, या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आतापर्यंत अनेक सुनावण्या देखील झाल्या आहेत. दरम्यान, या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 4 ऑक्टोबरला आणि उस्मानाबादच्या याचिकेवर 5 ऑक्टोबरला अंतिम … Read more