“लंपी’बाबत उपायुक्त कार्यालयाकडून “झाकाझाकी’

संतोष पवार सातारा  – जनावरांच्या लंपी स्किन या गंभीर आजाराबाबत पशुसंवर्धनच्या येथील उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात येणारी माहिती अपुरी आणि बनवाबनवीची असल्याचे मागील काही अहवालांचे निरीक्षण केल्यानंतर दिसून येत आहे. “लंपी’बाबत उपायुक्त कार्यालयाकडून “झाकाझाकी’ होत असण्याची शक्‍यता असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या “बुस्टर डोस’ची या विभागाला गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी लंपी स्किनच्या संकटाचा तत्कालिन … Read more

करोनाचा धोका वाढला ! देशात 24 तासांत 10 हजार 158 नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली –  देशात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत आहे. नुकतेच मागील दोन दिवसांची करोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी देशात 7,830 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. आज … Read more

Covid-19 News : बूस्टर डोससाठी धोरण निश्चित करण्याची मागणी; ‘या’ दिवशी होणार हायकोर्टात सुनावणी

मुंबई – मुंबईसह राज्यभरात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच करोनाला आळा घालण्यासाठी त्यावरील बूस्टर डोससाठी धोरण निश्‍चित करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह पालिका प्रशासनाला देण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 27 एप्रिल रोजी … Read more

पुण्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ ! शहरात 16 दिवसांत 80 हजार जणांचे मोफत लसीकरण

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -करोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 16 दिवसांत 80 हजार जणांनी डोस घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोफत डोस … Read more

Booster Dose: केवळ 11 टक्के प्रौढांनी घेतला करोनालसींचा बूस्टर डोस

नवी दिल्ली  – देशातील 18 वर्षांवरील सुमारे 69 कोटी प्रौढ नागरिक करोनालसींचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. मात्र, त्यातील केवळ 11 टक्के प्रौढांनी बूस्टर डोस घेतला आहे. तो निरूत्साह केंद्र सरकारच्या दृष्टीने चिंतेचे कारण बनला आहे. चालू वर्षी 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर किंवा … Read more

केंद्राचा दिलासा; बूस्टर डोससाठीचा कालावधी ‘इतक्या’ महिन्यांनी केला कमी

दिल्ली – देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाने 190 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका कमी झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन आणि व्हेन्टिलेटरवर रुग्ण जाण्याचे प्रमाण घटले. तर, घरीच उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त होते. … Read more

लसीचा दुसरा डोस महिनाभरात पूर्ण करा

पुणे : करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्‍यक आहे. कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित … Read more

पंतप्रधान घेणार बूस्टर डोसचाही आढावा; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरू झाली आहे. या करोनाच्या स्थितीवरुन उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील करोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा … Read more

पुणे : आता 45 वर्षे वयापुढील नागरिकांना बूस्टर डोस द्या

वैद्यकीय क्षेत्र, नागरिकांची मागणी ः खासगी रुग्णालयांत लसींचे डोस शिल्लक पुणे – गेल्यावर्षी 1 मार्चपासून, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षे वयापुढील सहव्याधी असणाऱ्या नागारिकांसाठीचा करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे यावर्षीही किमान सगळ्या 45 वर्षांपुढील व्यक्तींना बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्र आणि नागरिकांमधून मागणी होत आहे. एकूणच लसीकरण वेगाने आणि बऱ्यापैकी … Read more

बूस्टर डोससाठी फोन आला, तर व्हा सतर्क; पोलिसांकडून जागृती

जुन्नर  – सायबर हॅकरकडून फसवणुकीचा नवीन फंडा अवलंबविला जात आहे. फोनवर करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची अचूक तारीख सांगत त्यानंतर ओमायक्रॉन टाळण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोससाठी विनंती हॅकर करेल, ओटीपी पाठवल्यानंतर मोबाइल हॅक करत बॅंक खात्यातून रक्कम लांबवत फसवणूक होते. फसवणूक टाळण्यासाठी आळेफाटा पोलीस जनजागृती करत आहेत. या प्रकारात हॅकर कॉल करत फोनवरील व्यक्तीस त्याच्या … Read more