लसीकरणाच्या बूस्टर डोसबाबत जगभर संशोधन

पुणे- करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांत निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास करून बूस्टर डोस द्यावा किंवा नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू झाला आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला तीन महिन्यानंतर वर्ष पूर्ण होईल. परंतु मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या लाभार्थीपासूनचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये अँटिबॉडीज वाढल्या … Read more

भारतात या टप्प्यात तरी कोविड बूस्टर डोसची गरज नाही ; आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली –  भारतात सध्याच्या टप्प्यात तरी कोविड लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. देशातील बहुतांशी लोकसंख्येला कोविडचे दोन्ही डोस देऊन झाले असतील तर त्यानंतरच्या स्थितीत कोविडचा बूस्टर डोस देण्याच्या संबंधात विचार केला जाऊ शकतो. पण अजून दोन्ही डोस मिळालेल्या नागरीकांची संख्या 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी असताना … Read more

सध्या तरी भारतात बूस्टर डोसचा विचार नाही; केंद्र सरकार करोनाचे दोन डोस देण्यावरच ठाम

नवी दिल्ली : जगभरात करोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू  करण्यात येत आहे. मात्र देशात अशा कोणत्याही बूस्टर डोसची सध्या तरी गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता आम्ही प्रत्येक भारतीयाला करोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्र देण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ते लक्ष्य पूर्ण झाल्यावर बूस्टर डोस … Read more

भारतात कोविड बूस्टर डोसची गरज आहे का?

कोरोनाविरोधातील लस देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेकांना लस देऊनही कोरोना होत असल्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे आता भारतात देखील बुस्टर डोस दिला जाणार का? या बाबत संभ्रम आहे. दरम्यान, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर भाष्य केलं आहे. सध्या आपल्याकडे बूस्टर … Read more

करोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या तरी गरज नाही; डेल्टा व्हेरियंटविषयी WHO नी दिली ‘ही’ माहिती

नवी दिल्ली : जगात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आली नाही. त्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यावरच आता जागतिक आरोग्य संघटनेने महत्वाची माहिती दिली आहे. तसेच संघटनेकडून  दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नसल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की,सर्वात आधी आपल्याला … Read more

Corona vaccine : “करोना लसीच्या दोन डोसनंतर ‘बुस्टर डोस’ही घ्यावा लागणार”

लंडन – करोनावर आतापर्यंत जेवढ्या लसी आल्या आहेत त्यांचा एक किंवा दोन डोस दिले जात आहेत. त्यातून करोनाच्या विरोधात बऱ्यापैकी संरक्षण होते असे म्हटले जाते. मात्र तरीही काहींना करोनाची लागण झाल्याचे उदाहरण आहे. तर काहींचा मृत्यू झाला आहे. मात्र आता एका लसीचा आणखी एक म्हणजे तिसरा म्हणजे बुस्टर घेतला तर करोनापासून संपूर्ण संरक्षण होईल असा … Read more

ग्रेट न्यूज : कोव्हिशिल्डचा बुस्टर डोस (तिसरा डोस) सर्वच विषाणूंना मारणार

लंडन – सध्या जगभरात कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या लसी वापरल्या जात आहे. यापैकी एक महत्त्वाची लस म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या एस्ट्रोजेनेका म्हणजेच कोव्हिशील्ड लस. याच लसीबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात एक मोठी गोष्ट समोर आलीय. कोव्हिशील्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस दिल्यानंतर शरीराला सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळेल, … Read more

लसीकरणानंतरही दरवर्षी बूस्टर डोसही घ्यावा लागेल

वर्ष 2020 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात “नोबेल पारितोषिक’ जिंकणाऱ्या तीन शास्त्रज्ञांपैकी एक डॉ. ह्यूटन यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलेले हे मुद्दे लक्षणीय आहेत. केवळ लस घतली म्हणजे विषय संपला असे नसून, लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती उत्तमच ठेवावी लागेल, शिवाय दरवर्षी या लसीचा बूस्टर डोसही घ्यावा लागेल, असे ते सांगतात. वाचूया अधिक… कमीत कमी वर्षभर जगात सर्वांना … Read more

पुणे जिल्हा : विकासकामांसाठी झेडपीला बुस्टर डोस

पुणे – जिल्हा वार्षिक योजनेसाठी यंदा उशिरा परवानगी मिळत असली तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा जिल्हा परिषदेला होणार आहे. वार्षिक योजनेतील कामे तात्काळ करण्याची प्रक्रिया आणि पुढील दोन वर्षांसाठी कामांचा कालावधी असल्याने यंदाच्या आराखड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त विकासकामांचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्याची वार्षिक योजना 560 कोटी रुपयांची असून त्याचा नियोजनासंदर्भात नुकतीच प्रशासकीय पातळीवर … Read more