पुणे जिल्हा : धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती राजगुरूनगर : शिवसेना धनुष्यबाणावरच निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) संकल्प अभियान मिशन 48 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले त्यानंतर कार्यकर्ता मेळावा तथा मनाच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर राजगुरूनगर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, … Read more

पक्षाचे नाव अन् चिन्ह शिंदेंना मिळाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,“निकालावर चर्चा…”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि ‘शिवसेना’ हे नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयावर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शरद पवार … Read more

पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाकडे गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शेअर केला ‘तो’ फोटो; बोलक्या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया

मुंबई : निवडणूक आयोगाने ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट यांच्यातल्या वादावर निकाल देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना हे दोन्ही राहिले नाहीत. मात्र  या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वृत्तामुळे राजकीय … Read more

शिवसेनेचे शिंदे गटाच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्या गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. त्या याचिकेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या याचिकेवर कार्यवाही सुरू करून दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याची सुचना केली आहे. … Read more

धनुष्यबाण कोणाला मिळणार? शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले गेले आहे, ज्यात पक्षाच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक शाखांचे समर्थन पत्र आणि प्रतिस्पर्धी गटांच्या लेखी निवेदनांचा समावेश करण्यास … Read more

‘धनुष्यबाण’ चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबद्द्ल. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण … Read more

“निवडणुकीमध्ये चेहरा पाहिला जात नाही धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार”; मंडई विद्यापीठ कट्ट्यावर शिवसैनिकांची भूमिका

सहकार नगर – सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यक्ती किंवा चेहरा पाहिला जात नाही, तर धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार समजून शिवसैनिक काम करत आहेत आणि करतील. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा राहील, असा विश्वास शिवसैनिकांनी मांडला. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, कोरोना महामारीचे सावट संपले नाही, त्यामुळे घर हेपण एक मंदिरच हीच सामान्य नागरिकांची भावना आहे. … Read more

“कमळा’मुळे “धनुष्य बाण’ कोलमडणार ? जुन्नर तालुक्‍यातील स्थिती

पुणे – जुन्नर तालुक्‍यातील कट्टर शिवसैनिक तथा जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी एकनिष्ठेने 20 वर्षे तालुक्‍यात शिवसेना वाढवली, त्यांची काही महिन्यांपूर्वी पक्षाने हकालपट्टी केली तरी अनेक महिने पक्षाशीच बांधिल राहिल्या; पण आगामी निवडणुका आणि हकालपट्टीचे शल्य झुगारून त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपचे “कमळ’ हातात घेत शिवसेनेला “धोबीपछाड’ करण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, भाजपच्या या खेळीने जुन्नर … Read more