Elorda Cup 2024 (Boxing) : निखत-मीनाक्षीचे सुवर्णयश; भारताने 12 पदकांसह केला मोहिमेचा शेवट…

Elorda Cup 2024 : विद्यमान विश्वविजेत्या निखत झरीन आणि मीनाक्षी यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली. शनिवारी, भारतीय संघाने एलोर्डा चषक बॉक्सिंगमधील आपल्या मोहिमेचा शेवट 12 पदकांसह केला. निखत आणि मीनाक्षीच्या सुवर्णपदकांव्यतिरिक्त, भारतीय बॉक्सर्सनी दोन रौप्य आणि आठ कांस्यपदके जिंकून मागील हंगामापेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. गेल्या मोसमात भारतीय बॉक्सर्सनी पाच पदके जिंकली होती. … Read more

Boxing : राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी ‘जिया शेख’ची निवड…

पुणे – अकोला येथे ८ ते १० मार्च दरम्यान झालेल्या सबजुनीयर गर्ल्स राज्यस्तरीय मुष्टीयुद्ध निवड चाचणीत जिया शेख हीने अफलातून कामगिरी केली व सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत एमआय बॉक्सिंग क्लबकडून जिया शेख सहभागी झाली होती. या स्पर्ध्येत जियाने तीन सामने खेळुन तिनही सामने विजयी होऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. IPL : ‘या’ गोलंदाजाने … Read more

World Olympic Qualifying Tournament 2024 (Boxing) : भारताच्या निशांत देवची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

World Olympic Boxing Qualification Tournament 2024 (इटली) –  वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता निशांत देवने शुक्रवारी इटलीच्या बुस्टो अर्सिझियो येथे पहिल्या जागतिक बॉक्सिंग पात्रता (पॅरिस ऑलिम्पिक 2024 ) स्पर्धेत जॉर्जियाच्या एस्करखान मादियेववर क्लिनिकल विजय मिळवून राउंड ऑफ 16 (उपांत्यपूर्व फेरी) मध्ये प्रवेश केला. पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर निशांतने टोकियो ऑलिम्पियन एस्कारखान मादियेवचा 5-0 असा … Read more

Khelo India Youth Games 2023 : मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या ‘देविका घोरपडे’चा सुवर्णपंच

चेन्नई – पुण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू देविका घोरपडे(लाल जर्सी) हिने हरयाणाच्या निधीला सहज पराभूत करताना ५०-५२ किलो वजनी गटाचे सुवर्णपदक मिळविले. देविकाने उपांत्य फेरीत मागील वर्षीची सुवर्णपदक विजेती हरयाणाच्या मोहिनीला पराभूत केले होते. त्यामुळे अंतिम लढतीत निधीची खूप मोठे आव्हान नव्हते. देविकाने निधीला सहज पराभूत करताना सुवर्ण पदक मिळविले. या स्पर्धेतील देविकाचे हे चौथे पदक आहे. … Read more

Boxing : पुण्याच्या केंद्रिय विद्यालयाचे मुष्टियुद्ध स्पर्धेत यश…

पुणे – केंद्रीय विद्यालय जम्मु विभागाने आयोजित केलेल्या नॅशनल स्पोर्टस मीट महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्यातील केंद्रीय विद्यालयाला तब्बल 9 पदके मिळाली. या स्पर्धेत विविध गटात विद्यालयाच्या 14 मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात 2 रजत तर 7 ब्रॉंझ अशी एकूण नऊ पदके प्राप्त केली. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लक्ष्मण पवार, संजय भुकन यांनी या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन … Read more

Asian Games 2023 (Boxing) : लवलिनाची अंतिम फेरीत धडक; ऑलिम्पिक कोटाही केला निश्‍चित…

हांगझोऊ – भारताची स्टार महिला मुष्टियुद्धपटू लवलिना बोर्गोहेन हीने मंगळावारी आशियाई क्रीडा स्पर्धेत 75 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या कामगिरीच्या जोरावर तीने किमान रजतपदक निश्‍चित करताना आगामी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला. गत ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलिनाने 75 किलो वजनी गटात थायलंडच्या मनिकोन बायसनचा 5-0 असा धुव्वा उडवला. लवलिनासह भारताची आणखी एक … Read more

कोठावळे यांनी ग्रामीण भागात खेळाडू घडवले

पारनेर  – तालुक्‍याच्या सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम करत असलेल्या राजेश्वरी कोठावळे या महिला सक्षमीकरणासाठी उत्तम काम करत आहेत. तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तालुक्‍यामध्ये अनेक महिला व मुलींना प्रशिक्षण देत कराटे, बॉक्‍सिंगसारख्या क्रीडा प्रकारामध्ये तालुक्‍यातील ग्रामीण भागातील खेळाडू घडवले आहे, असे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले. म्हसणे येथील समर्थ पॉलिटेक्‍निक … Read more

#CWG2022 #Boxing : मुष्टियोद्धा ‘एम. हुसामुद्दीन’ आणि ‘नितूसिंग’ची पदकनिश्‍चिती

बर्मिंगहॅम –  भारताचा अनुभवी मुष्टियुद्ध खेळाडू महंमद हुसामुद्दीन याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठताना पदकही निश्‍चित केले आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग डेव्हेलोवर 4-1 असा विजय मिळवला. 2️⃣MEDAL ASSURED FOR 🇮🇳 @Hussamboxer shows strong nerves of steel to clinch the bout by a split 4:1 decision and book his berth … Read more

#CWG2022 #Boxing : बॉक्‍सर लोव्हलिनाचा सहज विजय,आता उपांत्यपूर्व फेरीत….

बर्मिंगहॅम – भारतीय बॉक्‍सर लोव्हलिना बोर्गोहेनने (70 किलो) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 70 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लोव्हलिनाने एरियाना निकोल्सनविरुद्ध 5-0 असा सहज विजय मिळवला. तसेच मोहम्मद हुसामुद्दीन याने पुरुषांच्या फेदरवेट गटात दक्षिण आफ्रिकेच्या ऍमझोले ड्याईचा 5-0 अस समान फरकाने पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. INTO THE QUARTERFINALS! 👊 What a … Read more

#CWG2022 #Boxing : भारताच्या शिव थापाची धडाक्यात सुरूवात; पाकिस्तानी बॉक्सरला हरवत….

बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उत्तम लयीत असल्याचे दिसून आले आहेत. भारताचा बॉक्‍सर शिव थापाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला याला 5-0 च्या फरकाने मात देत 63 किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या दिवशी भारताचा बॉक्‍सर शिव थापाने राऊंड ऑफ 32चा सामना पाकिस्तानच्या सुलेमान … Read more