महापालिका हद्दीत समाविष्ट २३ गावांना अखेर यूडीसीपीआर नियमावली लागू; रखडलेल्या हजारों बांधकामांना होणार फायदा

– विवेकानंद काटमोरे / प्रतिनिधी  मांजरी : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमधील बांधकामासाठी ‘एकात्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गेली चार वर्षापासून २३ गावांच्या या हद्दीत रखडलेल्या हजारो बांधकामांना चालना मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या सह सचिव डॉ.प्रतिभा भदाणे यांनी हे आदेश काढले आहेत. राज्यातील बांधकामांसाठी सुधारित … Read more

PUNE: एसआरए प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची अटच काढली

पुणे – बांधकाम सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर वेळेत प्रकल्प मार्गी लावण्यासाठीचे बंधन झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या प्रारुप नियमावलीत घालण्यात आले होते. परंतू या नियमावलीस अंतिम मान्यता देताना राज्य सरकारकडून ही तरतूदच काढून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुनर्वसन योजनांसाठी तयार केलेल्या सुधारित नियमावलीच्या प्रारूपमध्ये पुनर्वसन प्रकल्पांना चार एफएसआयबरोबरच अनेक सवलती देण्याची तरतूदी … Read more

नऊ हजारांवर गृहनिर्माण संस्था जमीन मालकी हक्‍कापासून दूरच!

पुणे – जमिनीचा मालकी हक्क गृहसंस्थेला प्रदान करणारी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया शासनाने सोपी केली आहे. मात्र, शहरातील अजूनही नऊ हजारांपेक्षा अधिक गृहनिर्माण संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या संस्था जमिनीच्या मालकी हक्कापासून दूर राहिल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकाने सदनिकेच्या विक्रीनंतर गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीची मालकी हस्तांतरित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा तसे … Read more

‘जे खुर्चीत बसलेत त्यांना केवळ उद्योजक, बिल्डरांची काळजी, शेतकऱ्यांची नाही’ – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर – “हे बिल्डरांचे सरकार आहे. त्यांच्या डोक्‍यावर कर्ज असते तर ते माफ झाले असते. मात्र, शेतकऱ्यांसाठी (farmers) सरकारला वेळ नाही. मात्र, शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आम्ही तुमच्या समवेत आहोत,’ असा विश्‍वास ठाकरे गटाचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मराठवाडम्याच्या दौऱ्यावर आले आहेत. … Read more

बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविणार – उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे – बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. तर, बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्यावतीने “पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम’ विषयावर आयोजित चर्चासत्रात सामंत बोलत होते. … Read more

सरकारने दिलेल्या सवलती ग्राहकांपर्यंत पोहचवा; बांधकाम व्यावसायिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ठाणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजाराला चालना देण्यासाठी वाळूच्या किमतीवरील कॅपसह सरकारने अनेक लाभ दिले आहेत, हे लाभ बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदीदारांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये शुक्रवारी रात्री एमसीएचआय-क्रेडाई मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारने अनेक लाभ देऊ … Read more

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे :- प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाण्यातील … Read more

बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : प्रत्येक व्यवसाय व व्यापाराची उभारणी नैतिकता व सचोटीच्या पायावर असावी. बांधकाम व्यवसायिकांनी नैतिकता व चारित्र्य जपले तर ती देशाची आणि ईश्वराचीदेखील सेवा ठरेल, असे सांगताना बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक व वास्तुरचनाकार यांना देण्यात येणारे 17वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आर्किटेक्ट व … Read more

बिल्डरांनी रखडवलेले प्रकल्प ताब्यात घेणार : जितेंद्र आव्हाड

मुंबई  – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बॅंकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा … Read more

“पुण्यात रश्मी शुक्ला खंडणी गोळा करायच्या; तक्रारीनंतर फडणवीसांनीच दाबलं प्रकरण”

मुंबई – सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे फोन टॅपिंग प्रकरणावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यात आता शुक्ला यांच्याविषयी धक्कादायक खुलासा … Read more