अग्रवालच्या अनधिकृत क्लबवर महाबळेश्वरमध्ये बुलडोझर

पाचगणी – पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे नाव आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नामक रिसॉर्टवर आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने … Read more

माणुसकीला काळिमा ! मुलीच्या तोंडात मिरची भरून फेविक्विकने ओठ चिकटवले ; आरोपीच्या घरावर बुलडोझर

Guna Rape Case ।

Guna Rape Case । मध्य प्रदेशातील गुना येथे राहणाऱ्या अयान पठाण नावाच्या तरुणानेत्याच्याच शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केले आहेत. हे अत्याचार करताना त्याने फेविक्विकद्वारे मुलीचे ओठ चिकटवून टाकले. त्यानंतर ती मुलगी रुग्णालयात दाखल आहे. या प्रकरणानंतर आता संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास केला. मात्र आज प्रशासनाने आरोपी अयान पठाणच्या घरावर … Read more

मीरा रोड: सोमवारी राम मंदिराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली, आता सरकारने चालवला बुलडोझर

मुंबई – मीरा रोड परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. सोमवारी याच परिसरात राम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. तेव्हापासून येथे तणावाचे वातावरण आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने अवैध बांधकामांवर ही कारवाई केली आहे. #WATCH | Illegal structures and encroachments razed … Read more

उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाई थांबवण्यास नकार; सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात सुरू असलेली बुलडोझर कारवाई थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अशा प्रकारची कारवाई थांबवली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेकायदेशीर बांधकांमावरील कारवाईच्या अधिकारावर गदा येईल आणि अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवली जाईल म्हणून त्यावर मज्जाव केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. एका विशिष्ट समुदायाला लक्ष करण्यासाठीच अशा स्वरूपाची कारवाई … Read more

दिल्लीत अतिक्रमणांच्या विरोधात बुलडोझर कारवाई सुरूच

नवी दिल्ली – उत्तर आणि दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली, त्यात मंगोलपुरी येथील नागरी स्टेडियमच्या भागाचा समावेश होता. तेथे अनेक जागांवर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. ती जमीनदोस्त केली जात आहेत. ेशहीद भगतसिंग स्टेडियमवर मंगोलपुरी येथे कारवाई सुरू होती, जिथे आतील भागात काही लोकांनी अतिक्रमण केले आहे आणि आवारात … Read more

बुलडोझर कारवाई कायदा व्यवस्था मोडीत काढणारी – चिदंबरम

नवी दिल्ली – देशात काही ठिकाणी जाणिवपुर्वक करण्यात आलेली बुलडोझर कारवाई ही देशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पुर्ण मोडीत काढणारी ठरली असून ही कारवाई केवळ मुस्लिम आणि गरीबांनाच लक्ष करणारी होती अशी टीका माजी गृहमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील जहांगीर पुरी … Read more