पिंपरी | श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत

कान्हे (वार्ताहर) – कान्हे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीमध्ये शंभरहून अधिक बैलगाडा धावल्या. तर, मावळ तालुक्यातील दत्ताशेठ गबळु साबळे व बंडाशेठ मधुकर पडवळ यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुका पंचक्रोशीतील बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालक मोठ्या … Read more

पुणे जिल्हा : परिंचेत नवागतांची बैलगाडीतून मिरवणूक

विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत दिल्या घोषणा परिंचे – पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील जिल्हा परिषद शाळेत बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांची गावामधे ढोल लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत घोषणा दिल्या. यावेळी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता. सुंदर रांगोळी, शालेय सजावट करून सुशोभीकरण करण्यात आले होते. केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर यांच्या … Read more

पुणे जिल्हा | पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला

लोणी- धामणी (प्रतिनिधी) – सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा घाटाजवळील पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. आठवडाभर पुरेल एवढेच पाणी या तळ्यात शिल्लक आहे. त्यामुळे या परिसरात थोड्याच दिवसात पाणी समस्या गंभीर बनणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर सह सहा गावांची कायमची दुष्काळग्रस्त म्हणून ओळख आहे. डिंबा धरणाचा उजवा कालवा याच परिसरातून … Read more

दुर्दैवी: बैलगाडा शर्यतीदरम्यान अंगावरून बैलगाडीचे चाक गेल्याने मुलाचा मृत्यू

सातारा – साताऱ्यातील बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार असे या मुलाचे नाव आहे. दोन बैलगाडीची धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येते आहे. या मुलाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा … Read more

मुलीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; बैलगाडीतून मिरवणूक काढत स्वागत

वीसगाव खोरे (पुणे जिल्हा)  – मुलीच्या जन्माला ओझं समजून तिचा जन्म नाकारणारे अनेक जण समाजात पाहावयास मिळतात. मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आजही पाहायला मिळतात. मुलगी वाचवण्यासाठी शासनाला कडक धोरण अवलंबवावे लागते; परंतु काही ठिकाणी आजही मुलीला लक्ष्मीचे प्रतिक मानून तिचे उत्साहाने स्वागत केले जाते आहे. उत्रौली (ता. भोर) … Read more

हिंगोली: दुचाकी बैलगाडीत ठेवून लक्षवेधी आंदोलन; काॅंग्रेसकडून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध

हिंगोली – केंद्र सरकारकडून सुरु असलेला केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, वाढती महागाई, बेरोजगारी, सरकारची चुकीची धोरणे याविरोधात आज देशभरात काॅंग्रेसकडून आंदोलन सुरु आहे. या दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आमदार डाॅ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी चौकतून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हातगाड्यामध्ये दुचाकी ठेवून हातगाडा ओढण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाअधिकारी … Read more

पुणे जिल्हा: बळीराजाची लेक बैलगाडीतून निघाली लग्नाला!

वीसगाव खोरे – शेतकरी धर्माला साजेशा अस्सल पारंपरिक पद्धतीने उत्रौलीतील वधू कोमल सजविलेल्या बैलगाडीतून लग्न स्थळी पोहचली. यावेळी बैलजोडीच्या पायात तोडे, कपाळावर बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा, चंगाळ, शिंगांना हिंगुळ, बेघड, टोकावर शेंब्या, कपाळावर गोंडे (धारक्‍या), डाव्या बाजूच्या पुढील पायात दृष्ट लागू नये म्हणून काळा दोरा, अंगावर झुल, फूगे, रिबिन असा साज चढवला होता. फुलं, पानांनी … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या बैलगाड्याने केला 12 सेकंदांत घाट पार

इंदोरी – इंदोरी येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, शौकिनांनी केलेली एकच गर्दी अशातच भिर्रर्र…. झाली…. अशी आरोळी कानी पडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैलगाड्याने 12 सेकंदांत इंदोरीचा घाट पार केला. त्यानंतर उपस्थितांनी केलेला जल्लोष हा बैलगाडा शर्यतींमधील उत्साह द्विगुणीत करणारा ठरला. मावळ तालुक्‍यातील इंदोरी येथील महाहिंदकेसरी घाट येथे निमंत्रित बैलगाडा शर्यतीचे रविवारी (दि.20) आयोजन … Read more

बैलगाडीतून दुचाकीची वरात; इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे – पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीच्या विरोधात गुरूवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेल ची किंमत दररोज वाढत आहे. 112 रुपये पेट्रोल झाले आहे तर डिझेलने सुद्धा शंभरी ओलांडली आहे. तेलांच्या दररोजच्या या दरवाढीच्या विरोधात बैलगाडीवर टू व्हिलर ठेवत प्रवास करून हे अभिनव आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार विरोधात … Read more

शर्यती गाजवणाऱ्या ‘केटीएम’ बैलाच्या मृत्यूने हळहळ

कार्ला – वेहरगाव येथील प्रसिद्ध गाडामालक सुरेश हुकाजी गायकवाड यांच्या केटीएम (लक्ष्या) या बैलाने मावळ तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यात अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या अशा या नामवंत बैलाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याने बैलगाडा शौकीनांसह कार्ला परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गायकवाड कुटुंबीय बैलांची जीवापाड संभाळ करत आहे. एक एकर शेतीवर बैलांकरीता वातानुकुलित गोठा, … Read more