काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्‍या बसवर दहशतवादी हल्‍ला; बस दरीत कोसळून ९ भाविकांचा मृत्‍यू, ३३ जण जखमी

जम्‍मू – जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने नऊ जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी … Read more

Pakistan : पाकिस्तानात बस दरीत पडून २८ ठार

कराची – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान २८ जण ठार आणि अन्य २२ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तुर्बतहून क्वेट्टाकडे निघालेली ही बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत कोसळली. बसमधील ६ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेत … Read more

Pune: निवडणुकीतून पीएमपीला मिळाले दीड कोटींचे उत्पन्न

पुणे – लोकसभा निवडणुकीत पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती या मतदारसंघांत मतपेट्या वाहून नेण्यासाठी पीएमपीकडून ९३१ बस पुरविण्यात आल्या होत्या. त्यामधून प्रशासनाला कोटी 57 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिकेच्या मतदानासाठी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार पीएमपीच्या किती बस लागतील, याची माहिती देतात. यावेळी … Read more

पिरंगुट घाटात खासगी बसला आग; मोठा अनर्थ टळला

पुणे : पिरंगुट घाटात खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. बसमधील प्रवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. पिरंगुटहून पुण्याकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसने रविवारी रात्री पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रादेशिक विभागाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन … Read more

पुणे | एसटीच्या ताफ्यात लवकरच ५०० चालक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात आता नव्याने ५०० चालक प्रशिक्षणानंतर रूजू होणार आहेत. तत्पुर्वी यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले आहेत. ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या भरून निघेल आणि मार्गावरील बसची संख्या वाढविणे एसटी प्रशासनाला शक्य झाले आहे. एसटीच्या ताफ्यात … Read more

पुणे जिल्हा | पाबळ फाटा येथे बस थांबा उभारा

सविंदणे (वार्ताहर)-  उरण- पनवेल – नेरळ – भोरगीरी – वाडा – खेड – शिरुर – पाबळ रस्ता राज्य मार्ग १०३ हा पाबळ फाटा शिरूर हद्दीपर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर यांच्या अखत्यारीत असून संबंधीत रस्ता हा “उरण-पनवेल-नेरळ-भोरगीरी-वाडा-खेड-शिरुर-पाबळ रामलिंग-आण्णापूर- निमगाव भोगी – आमदाबाद – टाकळीहाजी- जांबूत- मलठण – कान्हूर मेसाई – कवठे-सविंदणे, अशा विविध ठिकाणी जोडणारा एक … Read more

गाझीपूरमध्‍ये वऱ्हाडावर काळाचा घाला; 11000 वोल्टची तार पडून बस पेटली, पाच जणांचा जागीच मृत्यू

गाझीपूर  – हाय टेंशन वायर चालत्या बसवर पडल्याने बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये घडली आहे. या आगीच्या घटनेत बसमधील 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ११हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही दुर्घटना एका लग्‍न सोहळ्यातून परतत असताना घडली. या बसमधून सुमारे … Read more

Pune: पीएमपीतही महिलांना मोफत बससेवा

पुणे – पीएमपीच्या महिला विशेष बसमधून महिलांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ही मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दि. 8 मार्च रोजी शहरातील 17 मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार असून, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. … Read more

पुणे | सीएनजीपेक्षा ई बसला प्राधान्य द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- सार्वजनिक वाहतुकीसाठी ई- बस वापरण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. पण, पीएमपीकडून सुमारे ४०० सीएनजी बसेस भाडेकराराने घेण्याची निविदा काढण्यात आली आहे. तुलनेत ई-बसच्या इंधनाचा (विजेचा) दर कमी असल्याने पीएमपीला त्याचा फायदा होणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने तातडीने ही निविदा रद्द करून ई-बसच घ्यावात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे … Read more

पुणे जिल्हा | वाघोलीत खासगी ट्रॅव्हल्स बस आगीत जळून खाक

वाघोली, (प्रतिनिधी)- मुंबई ते यवतमाळ या मार्गावरील खाजगी ट्रॅव्हल्स बसला पुणे-नगर रोडवर वाघोलीत गुरुवारी (दि. 15) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने यामधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाणक्य ट्रॅव्हल्सची मुंबई ते पुसद बस पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे गरम झाल्याने मागील बाजूने बस पेटल्याचे चालकाला … Read more