राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

Chhagan Bhujbal : संजय गायकवाडांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ भडकले ; म्हणाले,”मला कमरेत लाथ घालून…”

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनीसडकून टीका केली. संजय गायकवाड यांनी तर छगन भुजबळ यांना “त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा”, असेही धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी आपल्या … Read more

दोन आमदार आणि एका कॅबिनेट मंत्र्यांचा ताफा अडवला; मराठा समाज आक्रमक..

लातूर – राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली तारीख आज संपत आहे, तरीही सरकारकडून कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. तर दुसरीकडे अनेक गावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केलेली आहे. तसेच आमदारांचे … Read more

“हसन मुश्रीफांसह 9 मंत्र्यांची हकालपट्टी करा” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde fadanvis sarkar) येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळात असणाऱ्या 9 भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी. अन्यथा 15 दिवसांनंतर त्यांच्याबाबतीतले भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर करू, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ज्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून … Read more

४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; 20 मंत्र्यांच्या हाती राज्याच्या कारभाराची धुरा

मुंबई : गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील … Read more

श्रीनिवासा गोविंदा..! व्यंकटेश्वराच्या चरणी आदित्य ठाकरे लीन, फोटो व्हायरल

तिरुपती – शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहाटे तिरुपती देवस्थाना भेट दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. सध्या सोशल मीडियावर आदित्य यांचे मंदिरातील हे व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र आदित्य ठाकरे यांनी देवस्थानचे … Read more

मंञ्यासह सुपूञाला ठोकून टाकण्याची क्लिप प्रसारित ; मंञी गडाख यांच्या स्वियसहाय्यकांवर गोळीबार

अहमदनगर – जिल्ह्याचे जेष्ठ नेते साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख – पाटील यांचे सुपूञ शिवसेनेचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंञी शंकरराव गडाख यांच्या स्वियसहाय्यकावर गोळीबार झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसात राज्याचे कॅबिनेट मंञी शंकरराव गडाख – पाटील व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख – पाटील यांना जिवे ठार मारण्यासाठी इस्ञायली बनावटीचे २० पिस्टल घेवून आलो आहे. आमच्या … Read more

मंत्री गडाख यांचे स्वीय सहाय्यक राजळेंवर गोळीबार

नेवासा/सोनई  -शिवसेनेचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री 9.45 वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांनी राजळेंवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन राजळे यांना लागल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असले तरी … Read more

निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकारला धक्का ! कॅबिनेटमंत्र्यांचाच राजीनामा, समाजवादी पक्षात जाण्याची शक्यता

नवी दिल्ली – दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही विधानसभा निवडणूक 2024 मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावला आहे. मात्र निवडणूक एक महिना राहिली असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबर धक्का बसला आहे. … Read more

पूजा चव्हाण प्रकरण: संजय राठोडांनी पहिल्यांदाच दिले राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण; म्हणाले,…

मुंबई :   काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. या प्रकरणामुळे  अडचणीत आलेले  माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.  विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर   विरोधकांनीहे प्रकरण उचलून धरले होते. त्यातच  उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत … Read more