Arvind Kejriwal : केजरीवालांनी दिले ‘दिल्ली जल बोर्डा’चे कॅगकडून ऑडिट करण्याचे आदेश; म्हणाले,’भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही’

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने  दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जल बोर्डाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) ऑडिट करण्याचे आदेश दिले. हे आदेश देत केजरीवाल यांनी,भ्रष्टाचार खपवून घेतला जाऊ शकत नाही.” असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी जल बोर्डाच्या गेल्या … Read more

कॅगच्या रिपोर्टवरुन नितीन गडकरींची पहिल्यांदाच प्रतिक्रिया ; म्हणाले,”घोटाळा नाही, तर नफाच झाला…”

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयावर घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. द्वारका एक्स्प्रेसवेवर कॅगच्या रिपोर्टवरुन केंद्र सरकारविरोधात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, ‘द्वारका एस्क्प्रेसवेसंबंधी घोटाळ्याच्या बातम्या खोट्या आहेत. उलट द्वारका एक्स्प्रेसवेवर १२ टक्के पैसे वाचवण्यात आले आहेत असल्याचे म्हटले … Read more

CAG Report 2023 : अधिकाऱ्यांवर नितीन गडकरींनी फोडले कॅग घोटाळ्याचे खापर…

नवी दिल्ली :- कॅगच्या अहवालात नितीन गडकरी यांच्या मंत्रालयात मोठ्या घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. त्या संबंधात स्वत: गडकरी यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा आलेला नसला तरी त्यांनी या प्रकरणाचे खापर आपल्याच मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे वृत्त आहे. कॅगने या प्रकरणाच्या संबंधात गडकरी यांच्या मंत्रालयाला प्रश्‍नावली पाठवली होती. त्या प्रश्‍नांची गडकरींच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी समर्पक … Read more

केजरीवाल यांच्या निवासस्थानाचे कॅग करणार ऑडिट

नूतनीकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप ; आप आणि भाजपमध्ये जुंपली नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यावरून केंद्र सरकारने नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांमार्फत (कॅग) विशेष ऑडिट (हिशेब तपासणी) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आप आणि भाजपमधील शाब्दिक युद्धाला नव्याने तोंड फुटले … Read more

मुंबई महापालिका ‘कॅग’च्या रडारवर; निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या गेल्या दोन वर्षांतील व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीमुळे शिवसेना ठाकरे गट अडचणीत येऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. तसेच शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे असा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे म्हटले जात आहे. करोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी … Read more

फुटबॉल महासंघाची ‘या’ प्रकरणी होणार कॅगकडून चौकशी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. ही चौकशी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या तक्रारीनंतर देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) करणार आहे. कॅगने यासाठी एक पथक नेमले असून महासंघाच्या आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यासंदर्भात … Read more

गंगा शुद्धीकरण प्रकल्पाचा निधी वापरलाच नाही; बिहार सरकारवर ‘कॅग’चे ताशेरे

पाटणा – केंद्राच्या ‘नमामि गंगे’ कार्यक्रमांतर्गत पाटणाशहरातील सांडपाणी सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या निधीचा मोठा भाग खर्चच न केल्याबद्दल कॅगने बिहार सरकारवर कडक ताशेरे मारले आहेत. कॅग ऑडिटमध्ये असे आढळून आले की 2016-17 ते 2019-20 या कालावधीत केवळ 16 ते 50 टक्के निधी वापरला गेला. परिणामी 683.10 कोटी रुपयांचा मोठा निधी बॅंक खात्यात तसाच पडून राहिला. … Read more

बॅंकांना पुरवण्यात आलेल्या निधीचे कॅग करणार ‘परफॉर्मन्स ऑडिट’

नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्फे बॅंकांना जो निधी पुरवण्यात आला आहे त्याचे परफॉर्मन्स ऑडिट करण्याचा निर्णय कॅगने घेतला असून त्यासंबंधात त्यांनी अर्थमंत्रालयाला पत्र पाठवून विविध प्रकारची माहिती मागवून घेतली आहे. सन2016-17 नंतर केंद्र सरकारकडून बॅंकांना जो निधी देण्यात आला आहे त्याचे हे ऑडिट केले जाणार आहे. सन 2016-17 साली सरकारने बॅंकांना 90 हजार कोटींचे भांडवल … Read more

गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध; कॅगच्या अहवालात समोर

नवी दिल्ली – गुजरातच्या आयुष विभागातील आरोग्याशी संबंधित खराब व्यवस्थेचा कॅगने पर्दाफाश केला आहे. आरोग्य क्षेत्रातील नुकत्याच दिलेल्या अहवालात आयुष विभागाची माहिती दिली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने आयुषचे कार्यक्रम मुख्य प्रवाहात आणले नसल्याचे कॅगच्या अहवालात नमूद केले आहे. कॅगच्या अहवालानुसार, आयुष विभागात संशोधनाचा अभाव, वाटप केलेली रक्कम खर्च करण्यास असमर्थता असे काही मुद्दे … Read more

कॅगकडून मोदी सरकारचे पितळ उघडे; जीएसटीचे हजारो कोटी रुपये दुसरीकडे वळवले !

कॅगच्या अहवालातील निष्कर्ष ; कृत्य कायद्याच्या विरोधात असल्याचा ठेवला ठपका नवी दिल्ली – केंद्र सरकारने राज्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी म्हणून पहिल्यापासूनच जीएसटीवर वेगळा सेस लागू केला होता. तथापि, या योजनेच्या पहिल्या दोन वर्षात यातील 47 हजार 272 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्यांना न देता परस्पर दुसरीकडे वळवले, असा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.  मोदी सरकारने … Read more