तुम्हीही स्मोकी पान खाताय ? तर वेळीच सावधा व्हा ! ; स्मोकी पानामुळे मुलीच्या पोटात पडले छिद्र

Smoky paan। द्रवरूप नायट्रोजनमध्ये स्टोअर केलेले पान खाण्याचा देखील ट्रेंड सध्या अतिशय लोकप्रिय आहे. लहान मुले देखील कुठलीही नवी गोष्ट पाहिली की ती करण्यासाठी उत्सुक असतात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असेलच असे नाही आणि मुलांसाठी तर अनेकदा अशा गोष्टी हानिकारकच असतात. अनेकदा पालकांकडून याकडे दुर्लक्ष होते. बंगलोर मध्ये देखील अशीच घटना … Read more

पुणे जिल्हा : पालकांनी मुलांबाबत दक्ष असणे गरजेचे – अजित पवार

बारामतीत पोषक आहार अभियान सुरू बारामती – आजची मुले हे देशाचे भविष्य आहेत.त्यामुळे ही पिढी सदृढ आणि सशक्‍त असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांबाबत यासाठी दक्ष असणे आवश्‍यक आहे. बारामतीत पोषक आहार अभियान सुरू होत असल्याचे मनापासून समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती येथे नटराज नाट्य कला मंदिर, श्री सद्‌गुरु विश्‍वनाथ महाराज … Read more

पालकांनो..! तुमची मुलं सुद्धा तुमच्या पासून ‘या’ गोष्टी लपवत आहेत का? आजच व्हा सावध, अन्यथा नंतर होईल मोठा पश्चाताप

पुणे – आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी पालक अनेकदा त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. असे असूनही, अनेकदा असे दिसून येते की ते पौगंडावस्थेत पोहोचल्यानंतर मुले त्यांच्या पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात. जाणून घ्या अश्या ‘पाच’ गोष्टी जे मुले आपल्या पालकांपासून लपवत असतात. १) प्रेम प्रकरण – आजकाल काही मुलं पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांचे अफेअर्स सुरु होतात … Read more

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; तरीही दक्षता घ्यावी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : गेले अनेक महिने शासन प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला असून आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शनिवारी( दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर … Read more

“राजकीय प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी काळजी घ्यावी”

मुंबई  – शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी जी सुचना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे त्यावर महसुल मंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांना सावधगीरीचा इशारा दिला आहे. राजकीय प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की सोनिया गांधी … Read more

सावधान…पुणे लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती

पुणे  – शहर लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती निर्माण झाली असून, गेल्या 24 तासांत 904 बाधितांची नोंद महापालिकेने केली आहे. तर दिवसभरात नऊ बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत.     बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून, गेल्या आठ दिवसांत ती पाचशेवरून नऊशेवर पोहोचली आहे. गेल्या तीन-चार दिवसात तर ती सातशेपेक्षा जास्त होती. मात्र, … Read more

सावधान…बर्ड फ्लूची पुण्याच्या सीमेवर धडक

पुणे – जिल्ह्यातील दौंडपाठोपाठ पुणे शहराच्या सीमेवरील मुळशी तालुक्यातील प्रकल्पातील तब्बल 5,139 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या पोल्ट्री परिसरातील एक किलोमीटरचे क्षेत्र बाधित तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पुढील 21 दिवस प्रतिबंध आदेश लागू करण्यात आला असून, कुकुट पक्ष्यांची … Read more

विवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगा

‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन मुंबई :- विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी करतात. बऱ्याच विवाह जमविणाऱ्या संस्थांनी पण आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत … Read more

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन… मुंबई – सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत पण … Read more