‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Entertainment|

Entertainment|  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शोमधील कलाकारांना देखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शोमधील कलाकारमंडळी अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातच आता अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोपूर्वी तिने अनेक मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने तिला खऱ्या अर्थाने … Read more

Celebrities Restaurants : कुणाचं आहे कॅफे तर कुणाचं आहे रेस्टॉरंट; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री आहेत शानदार हॉटेलच्या मालकीण….

Celebrities Restaurants : बॉलीवूड सेलिब्रिटी केवळ चित्रपटांतून पैसे कमावतात असे नाही तर अनेक अभिनेत्री स्वतःचे फूड रेस्टॉरंटही चालवतात. मौनी रॉयने अलीकडेच मुंबईत ‘बदमाश’ नावाने रेस्टॉरंट सुरु केले, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी भेट दिली. बॉलिवूडमध्ये अश्या 5 अभिनेत्री आहेत ज्या आलिशान रेस्टॉरंटच्या मालक आहेत. अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी मुंबईत त्यांच्या ‘बदमाश’ … Read more

सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या..! दहीहंडी पथकांची मागणी

मुंबई – दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी आता गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरु झाला आहे. बाळगोपाळांच्या उत्सुकतेत ढाकुम्माकुमचा आवाज आतापासूनच सर्वांच्या कानात घुमू लागला आहे. दहीहंडी हा मुंबईतील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यात गोविंदा पथकांचे मनोरे आणि सेलिब्रिटींची मांदियाळी असे हे समीकरण आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडीपूर्वी “सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व … Read more

पोलिसांचा हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा; ‘बिग बॉस’चा विजेत्यासह ‘या’ अभिनेत्याची मुलगी ताब्यात

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४२ जणांना ताब्यात घेतले आहे. या पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्याच व्यक्तींचाही समावेश आहे. बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये … Read more

“नेते आणि सेलिब्रिटींकडे लोकांना वाटण्यासाठी रेमडेसिवीर कसं आणि कुठून येतं?”

मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट जशी आली आहे तशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे.  त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्द्यावरून आता मुंबई उच्च  न्यायालयाने केंद्राला खडा सवाल केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जर सरकारशिवाय इतर कोणालाही औषध दिलं नाही तर लोकांना वाटप करण्यासाठी नेते आणि सेलिब्रिटींकडे हे औषध … Read more

CoronaUpdates : “मुंबईत सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमधील बेड अडवून ठेवले”

मुंबई  – मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असताना बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी सौम्य लक्षणे असतानाही मुंबईतल्या हॉस्पिटल मधील बेड अडवून ठेवले आहेत, असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. हे बेड गंभीर आजारी रुग्णांच्या उपचारांसाठी वापरले जायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट विश्वातील काही सेलिब्रिटींना करोना संसर्गाची … Read more