Apple Alert च्या वादावर केंद्राकडून कंपनीला नोटीस; कंपनीने प्रत्युत्तर देत म्हटले,”आम्ही तज्ञांना बोलावून तपास करू”

Apple Alert Row: देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आयफोनवर पाठवलेल्या अॅपल अलर्टबाबत सत्ताधारी भाजपवर सडकून टीका झाल्यानंतर आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारकडून या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, कंपनीकडूनही या नोटिसीवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसवर अॅपलने आपली बाजू  मांडली आहे. आम्ही बाहेरून तज्ञांना बोलावून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू … Read more

केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ; जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड असणार ‘ऐच्छिक’

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. कारण आता यापुढे जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नसून ते ऐच्छिक असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आलेआहे. केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नसल्याचेही नसल्याचे म्हटले आहे. … Read more

लालू प्रसाद यादवांवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; म्हणाले,”हा लोकशाहीच्या हत्येचा हा कुत्सित प्रयत्न”

नवी दिल्ली : जमिनीशी संबंधित घोटाळ्यात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने काल कारवाई केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर काँग्रेसदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना खरगे यांनी,”नरेंद्र मोदी सरकार हे विरोधी पक्षांच्या विरोधात … Read more

Jammu and Kashmir : अदानींवरून लक्ष वळवण्यासाठी काश्‍मीरचा वापर; मेहबुबा मुफ्तींचा आरोप

श्रीनगर :– जम्मू-काश्‍मीरमधील अतिक्रमणविरोधी कारवाईचा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्र सरकार अदानी प्रकरणापासून देशाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी जम्मू-काश्‍मीरचा वापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याची ग्वाही दिल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मेहबुबा म्हणाल्या, त्यांची वक्तव्ये म्हणजे … Read more

“…तरीही आत्मनिर्भरतेचे ढोल पिटले जातायत”; अर्थसंकल्पाच्या अगोदरच शिवसेनेकडून केंद्रावर निशाणा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  एकीकडे आर्थिक पाहणी अहवालामध्ये ६ टक्क्यांच्या आसपास आर्थिक विकासाचा दर सांगण्यात आला असून दुसरीकडे जागतिक पटलावर आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली … Read more

“न्यायपालिकेवर सरकारकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न..”; कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : देशातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी वापरण्यात येत असलेल्या ‘न्यायवृंद’ यंत्रणेवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद सुरु आहे. या सर्वात आता राज्यसभेचे खासदार आणि वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकार न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे. कपिल सिब्बल यांनी,“केंद्र सरकारला … Read more

केंद्राच्या शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधार ; निर्मला सीतारामन

भोरमध्ये लाभार्थींबरोबर साधला संवाद बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप सक्षमीकरण करणार भोर – स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस यांसारख्या अनेक योजनांमधून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, लाभ न मिळालेल्यांना लाभ देणार आहे. केंद्राने शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधारच दिला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचे सक्षमीकरण … Read more

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारावर परिणाम :दिलीप वळसे पाटील

घोडेगाव सहकारी संस्थेची शताब्दी मंचर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील … Read more

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना आदेश; म्हणाले,”वॉर रुम्स पुन्हा सुरु करा, निर्बंध लावा, गरज लागली तर पुन्हा एकदा…”

नवी दिल्ली : ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. याच   पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यात  गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा असा आदेशच दिला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमयक्रॉन तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे. केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून … Read more

OBC political reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्राच्या हालचाली, पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पाठोपाठ इतर राज्यांमधील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्याची भीती असल्याने ते टिकवण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न सुरु केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. केंद्र सरकार ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्‍यता … Read more