पुणे जिल्हा : चांडोहच्या सरपंचपदी सोनाली शरद खराडे

सविंदणे – शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सरपंचपदी सोनाली शरद खराडे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन सरपंच वंदना पानमंद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी खराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी माधुरी बागले, ग्रामविकास … Read more

जिल्हाधिकाऱ्यांसह वळसे पाटील शेताच्या बांधावर

अतिवृष्टीग्रस्त पिकांची केली पाहणी : तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन टाकळी हाजी – चांडोह (ता. शिरूर) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची आमदार दिलीप वळसे पाटील व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले. शिरूर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषि विभागाने सरसकट पंचनामे … Read more

वादळी पावसाने अस्मानी संकट

चांडोह परिसरात पिके भुईसपाट, घरावरील पत्रे उडाले; दुष्काळातून सावरूनही मरणयातना टाकळी हाजी – चांडोह (ता. शिरुर) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरातील अनेक घरांसह पिके, झाडे भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व परिसरातील शेतकऱ्यांतून … Read more

चांडोहमधील “त्या’ कामांची चौकशी सुरू

दोषींवर योग्य ती कारवाई करणार – गटविकास अधिकारी जठार यांचा इशारा सविंदणे -शिरूर तालुक्‍यातील चांडोह ग्रामपंचायतीमध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी संगनमताने लाखो रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार माजी सरपंच केशव कोंडे व ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांच्याकडे नुकतीच केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक प्रभातमध्ये आज (सोमवारी) प्रकाशित केल्यानंतर … Read more

चांडोह ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार?

माजी सरपंचांची निवेदनाद्वारे कारवाईची मागणी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनही कार्यवाही नाही पदाचा गैरवापर करून या कामांची बिले अदा केल्याचा आरोप सविंदणे – चांडोह (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे व गटविकास अधिकारी शिरूर यांना … Read more